Ahmedabad Airplane Clash: दोनवेळा मुख्यमंत्री,आयुष्यभर पक्षाची सेवा; विजय रुपाणींच्या अंत्ययात्रेचा खर्च भाजपनं नाकारला

Vijay Rupani funeral expenses : अहमदाबाद विमान अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या अंत्ययात्रा व शोकसभेच्या खर्चावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
Former Gujarat CM Vijay Rupani
Former Gujarat CM Vijay Rupanisarkarnama
Published on
Updated on

ठळक मुद्दे:

  1. अहमदाबाद विमान अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या अंत्ययात्रा व शोकसभेच्या खर्चावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

  2. भाजपकडून अंत्ययात्रेचा अंदाजे 25 लाखांचा खर्च उचलण्यास नकार देण्यात आला असून तो संपूर्ण भार रुपाणी कुटुंबावर टाकण्यात आला आहे.

  3. रुपाणी कुटुंबाच्या नाराजीमुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता असून सीआर पाटील यांनी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

Gujrat News: अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी झालेल्या एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात गुजरातचे दोनवेळा माजी मुख्यमंत्री राहिलेल्या आणि भाजपचे प्रमुख नेते विजय रुपाणी (Vijay Rupani) यांचाही दुर्दैवी अंत झाला होता. पत्नीला भेटण्यासाठी लंडनला निघालेल्या रुपाणींच्या अपघातानंतर आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. (Two-time Gujarat CM and loyal BJP leader Vijay Rupani’s funeral expenses worth ₹25 lakh were reportedly not borne by the party, sparking controversy and family anger)

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रा आणि शोकसभेशी संबंधित मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचा कट्टर आणि एकनिष्ठ नेता अशी ओळख राहिलेल्या रुपाणी यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित खर्च देण्यास भाजपनं नकार दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून (BJP) माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व खर्च देण्यास नकार देण्यात आला आहे. हा 25 लाखांचा संपूर्ण खर्च रुपाणी कुटुंबावर टाकण्यात आला आहे. रुपाणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जिवलग मित्र आणि गुजरातमधील अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.

Former Gujarat CM Vijay Rupani
Maharashtra Sadan Scam: दिल्लीतील 'महाराष्ट्र सदन' घोटाळाप्रकरणी बांधकाम व्यवसायिक चिमणकर बंधू दोषमुक्त! हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता

विजय रुपाणी यांच्या अंत्ययात्रा आणि शोकसभेचा खर्च त्यांच्या कुटुंबाच्या नावावर टाकण्यात आल्यामुळे भाजप रुपाणी कुटुंबाची मोठी नाराजी ओढवून घेण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,विजय रुपाणी यांच्या अंत्ययात्रेच्या वाहनांची सजावट, शहराची सजावट, बॅनर-पोस्टर्स आणि श्रद्धांजली सभेचा खर्च सुमारे 20 लाखांहून अधिक आणि 25 लाखांच्या आसपास असल्याची माहिती समोर येत आहे. जो आता रुपाणी कुटुंबानेच दिला आहे.

Former Gujarat CM Vijay Rupani
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं विधान; म्हणाले,' मोदींना मी दुश्मन मानत नाही...'

अहमदाबादमध्ये झालेल्या दुःखद विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पत्नी अंजली रुपाणी यांनी भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.त्या म्हणाल्या, त्यांच्या पतीने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्ष आणि संघटनेची सेवा केली. अशा परिस्थितीत त्यांच्या अंतिम प्रवासाचा आणि श्रद्धांजली सभेचा संपूर्ण खर्च पक्ष उचलेल अशी अपेक्षा होती. परंतु, उलट, संपूर्ण भार कुटुंबावर टाकण्यात आला, जो अत्यंत दुःखद असल्याची खंत अंजली रुपाणी यांनी व्यक्त केली आहे.

विजय रुपाणी यांच्या सन्मानार्थ राजकोटमध्ये मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली होती. तसेच शोकसभाही आयोजित करण्यात आली. हजारो लोक त्यांच्या प्रिय नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी आले होते. तथापि, आता अंत्यसंस्कार आणि शोकसभेच्या खर्चाच्या वादामुळे संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

Former Gujarat CM Vijay Rupani
Kiran Lahamate NCP : अजितदादांच्या दोन शिलेदारांच्या आरक्षणावर वेगवेगळ्या भूमिका; मुंडेंच्या भूमिकेवर लहामटेंचा थेट इशारा

केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी याबाबत माहिती देताना या प्रकरणाची चौकशी करुन आणि पक्षाकडून यासंबंधीची सविस्तर माहिती घेण्यात येईल असं म्हटलं आहे. तसेच पाटील यांनी रुपानी यांचे पक्ष आणि राज्यासाठी योगदान खूप मोठे आहे आणि असा वाद निर्माण करणे योग्य नसल्याचंही सांगितलं.

गुजरातच्या राजकारणात हा मुद्दा सतत चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधी पक्षही या मुद्द्यावर भाजपला घेरत आहेत आणि 'नेत्यांकडे दुर्लक्ष' असे म्हणत आहेत. विजय रुपाणी यांच्यासारख्या दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत झालेल्या खर्चावरून निर्माण होणारा वाद भाजपच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Former Gujarat CM Vijay Rupani
Kolhapur Politics : बाबू फरास यांनी जिन्यातच नगरसेवक फोडले अन् महाडिकांच्या कोल्हापुरातील सत्तेला पहिला हादरा बसला!

Q1: विजय रुपाणी यांचा मृत्यू कशामुळे झाला?
A1: अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

Q2: त्यांच्या अंत्ययात्रा आणि शोकसभेचा खर्च किती होता?
A2: सुमारे 25 लाखांचा खर्च आला होता.

Q3: हा खर्च कोणाकडून उचलला गेला?
A3: भाजपकडून नकार मिळाल्याने संपूर्ण खर्च रुपाणी कुटुंबाने उचलला.

Q4: या वादाबाबत भाजपची भूमिका काय आहे?
A4: गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी चौकशीची घोषणा केली असून असा वाद होऊ नये असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com