Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

BJP Mission Mumbai : 'प्लॅन तयार आहे, मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार'; आशिष शेलारांचा 'कॉन्फिडन्स'

BJP Plans for Mumbai Municipal Elections : मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे नेते मुंबईचे शहराध्यक्ष आमदार आशिष शेलारांकडून प्लॅन तयार आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा कधीही सुरू होईल. महाविकास आघाडी, महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढणार की, वेगवेगळे लढणार, हे अजून तरी स्पष्ट नाही. परंतु स्थानिक इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यात सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक ठरेल, ती म्हणजे मुंबई महापालिकेची! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जेवढी तयारी केली आहे, त्यापेक्षा अधिक तयारी भाजपने केली आहे. भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी तर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर कसा होईल, याच प्लॅन तयार असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या कामाल सुरवात केली होती. परिणामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा झाला. भाजपला (BJP) मुंबईत चांगले यश मिळाले. आता मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असं काम, नियोजन केल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबई (Mumbai) महापालिकेला समोरे जाताना भाजपने युवा कार्यकर्त्यांना संधी देण्याचे नियोजन ठेवलं आहे. यावेळी 30 वयोगटातील किमान 15 टक्के युवकांना नगरसेवकपदाची संधी देण्यात तयारी भाजप केली आहे. यासाठी युवा चेहरे हेरलं असल्याचा दावा देखील होत आहे. लोकसभा निवडणुकीला मुंबईत जे मतदार बाहेर पडले नव्हते, त्यांच्यावर काम केले.

प्रत्येक बूथ केंद्र भाजपने मुंबईत मजबूत केला आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. भाजपची ही सर्व तयारी मुंबई महापालिकेसाठी होती. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीला झाला. यातून भाजपचा 'कॉन्फिडन्स' वाढला आहे. आशिष शेलार यांनी यातूनच, तर भाजप तयार आहे, अशी गर्जना करत मुंबई महापालिकेसाठी शड्डू ठोकला आहे.

महायुती 185 जागा जिंकणार

मुंबई महापालिकेला महायुती म्हणून समोरे जाणार आहोत, असे सांगून गेल्या निवडणुकीत शिवसेनेसोबत 82 जागा भाजप जिंकल्या होत्या. मुंबईत भाजपच मोठा भाऊ आहे. महायुती मुंबईत जवळपास 185 जागा जिंकेल आणि भाजपचाच महापौर होईल, असा दावा आशिष शेलार यांनी केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही भाजप, असे एकत्र येत मुंबई महापालिकेवर आम्ही महायुतीचा झेंडा फडकवणारच आहोत, असा दावा शेलार यांनी केला.

मुंबईकरांची भावनिकपेक्षा विकासांच्या मुद्यांना पसंती

मुंबईत आता भावनिक मुद्दे चालणार नाही. इथं फक्त विकासाचा नारा चालणार आहे. मुंबई तोडणार, अदानी-अंबानी, धारावी यापुढे विरोधकांना दुसरे काहीच दिसत नाही. महायुतीच्या विकासापुढे विरोधकांकडे मु्द्देच शिल्लक नवाही. त्यामुळे विरोधकांनी निवडणूक कितीही भावनिक करण्याचा प्रयत्न केला, तरी मतदान हे विकासाच्या मुद्द्यावरच होणार आहे. मुंबईत विविध प्रकल्प मतदार दृष्टीआड करणार नाहीत. त्यामुळेच विरोधकांचे धाबे दणाणले आहे, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT