Kurla Best Bus Accident : कुर्ला बस अपघातानंतर पुणेकरांच्या 'त्या' आठवणी ताज्या ; 25 जानेवारी 2012 मध्ये काय घडलं होतं?

Kurla Bus Accident Rises 6 Dead 49 Injured: पोलिसांनी बेस्टचा बस चालक संजय मोरे याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात सदोष मनुष्य पदाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चालक मद्यधुंद अवस्थेत होता का? याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.
Kurla Best Bus Accident
Kurla Best Bus AccidentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबईमध्ये काल (सोमवारी) सायंकाळी कुर्ला परिसरामध्ये बेस्ट बसचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगात असणाऱ्या बेस्टच्या बसने अनेकांना चिरडलं. रस्त्यालगत असणाऱ्या मार्केटमध्ये ही बस घुसल्याने झालेल्या अपघातात 49 जण गंभीर जखमी झाले. 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

जेव्हा अपघात घडला तेव्हा या बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बेस्टचा बस चालक संजय मोरे याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात सदोष मनुष्य पदाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झाला, बसचे ब्रेक फेल झाले,? की चालक मद्यधुंद अवस्थेत होता.याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत. मात्र या अपघातानंतर पुणेकरांच्या 2012 मध्ये घडलेल्या बस अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Kurla Best Bus Accident
Kurla Bus Accident VIDEO : जो-जो समोर आला त्याला चिरडलं; कुर्ल्यातील बस अपघाताचा धक्कादायक CCTV आला समोर

काय होती घटना?

वर्ष 2012 मध्ये 25 जानेवारी रोजी स्वारगेट डेपोमध्ये काम करणाऱ्या संतोष माने या माथेफरू चालकाने एक बस पळून ती पुण्याच्या रस्त्यावर बेदरकारपणे फिरवली जो समोर आला त्याला त्याने बस खाली चिरडलं. यामध्ये नऊ निष्पाप लोकांना आपला प्राण गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले. घटना आठवल्यानंतर आजही पुणेकरांचा थरकाप उडतो. अशीच घटना आता मुंबईमध्ये घडल्याचं दिसून येत आहे.

Kurla Best Bus Accident
Eknath Shinde: आठवलेंच्या खास शैलीत शिंदेंची सभागृहात तुफान टोलेबाजी; पटोलेंना चिमटा VIDEO पाहा

कोण होता संतोष माने?

संतोष माने सोलापूर तालुक्यातील कवथळे या गावचा रहिवासी आहे. चालक म्हणून त्यांची 13 वर्ष स्वारगेट डेपोत काम केले होता. 25 जानेवारी 2012 ला त्याने स्वारगेट आगारातील एसटी बस पळवली आणि नंतर बेफानपणे पुण्याच्या रस्त्यावर जिकडे वाट फुटेल तिकडे बस फिरवली. समोर येईल त्याला त्याने उडवलं. यात अनेक गाड्यांचा अपघात झाला. पादचार्‍यांना देखील त्याने आपल्या एसटी बस खाली चिरडले. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला तर 37 जण गंभीर जखमी झाले.

पुढे काय झालं?

अपघात प्रकरणात संतोष मानेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.त्यानंतर शिवाजीनगर कोर्टामध्ये एक वर्ष हा खटला चालला यानंतर 8 एप्रिल 2013 ला संतोष मानेला या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

Kurla Best Bus Accident
Local Body Election : महाराष्ट्रात विकासाची चाके थांबली! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर

संतोष मानेला फाशीची शिक्षा झाली का?

संतोष माने ने केलेले कृत्य हे वेडाच्या भरात घडले असून भादंवि कलम 84 अन्वये हे गुन्हे माफ करावेत, असा बचाव माने यांच्या वकिलांनी पुण्याच्या सत्र न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात केला होता.

मानसोपचार तज्ज्ञांचे दोन अहवाल देखील कोर्टासमोर सादर करण्यात आले. मात्र कोर्टाने ते अमान्य केले. त्यानंतर माने सुप्रीम कोर्टात गेला.तिथे 2019 ला सर्वोच्च न्यायालयाने मानेला दिलासा देत त्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे रुपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com