Ashish Shelar, Chandrashekhar Bawankule, supriya sule Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar News : बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, सुळेंच्या कानपिचक्या, शेलारांचे कवितेतूनच उत्तर; ताईंचं पंचांग “हेरंब” लिहितात...

Maharashtra Politics : सुळेंनी हेरंब कुलकर्णीं यांची कविता टि्वट करीत बावनकुळे आणि भाजपला डिवचलं आहे.

Mangesh Mahale

Mumbai : ‘पत्रकारांना दर महिन्याला चहाला बोलवा, त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा," असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बावनकुळेंनी कानपिचक्या देत हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे. त्याला आमदार आशिष शेलारांनी कवितेतूनच प्रत्युत्तर दिले आहे.

"पत्रकारांना महिन्यातून धाब्यावर न्या, एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे हे समजले असेल, असा सल्ला बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला होता. यावरून बावनकुळेंना विरोधकांनी धारेवर धरलं आहे. सुळेंनी हेरंब कुलकर्णीं यांची कविता टि्वट करीत बावनकुळे आणि भाजपला डिवचलं आहे. त्यावर आशिष शेलारांनी पलटवार केला आहे. आशिष शेलार यांनी म्हटले आहे की,

ताईंचं पंचांग “हेरंब” लिहितात,

मटण खाऊन सॅनिटायझर लावून ताई खुशाल देवदर्शन करतात

ताई खुशाल महाराष्ट्राच्या प्रथा-परंपरा अशा ‘धाब्यावर’ बसवतात

पुरोगामी, पुरोगामी असा जप मात्र न चुकता करतात

आणि बरं का?

डावी बाजू सांगायला पण ताईंना एखादे “कुलकर्णी”च हवे असतात!

काय म्हणाले होते बावनकुळे...

अहमदनगर येथे रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल दिलेल्या ‘कानमंत्रा’ची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. "ज्या बूथवर तुम्ही काम कराल, तेथील पत्रकारांची यादी तयार करा, महाविजय 2024पर्यंत आपल्याविरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या. या पत्रकारांना महिन्यातून धाब्यावर न्या, एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे हे समजले असेल," असा सल्ला बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT