Sanjay Raut, Atul Bhatkhalkar, Tejashwi Yadav Sarkarnama
मुंबई

Nitish Kumar Resign : 'तेजस्वी यादव बिहारचे संजय राऊत ठरले'; अतुल भातखळकरांचा खोचक टोला

Ganesh Thombare

Mumbai News : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे महागठबंधनचे सरकार कोसळले. नितीशकुमार आता भाजपबरोबर जाऊन लवकरच सरकार स्थापन करणार आहे. नितीशकुमार भाजपबरोबर गेल्यामुळे 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील विकासकामांचा श्रेयवाद घेण्यासाठी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात अंतर्गत धुसफुस सुरू होती. (BJP MLA Atul Bhatkhalkar On Nitish Kumar Resign and Tejashwi Yadav)

यामुळे नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत गेला आणि नितीशकुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिहारमधील या राजकीय घडामोडींवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तेजस्वी यादव यांना बिहारचे संजय राऊत म्हणत डिवचलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दररोज सकाळी माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर भाष्य करतात. तसेच मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधतात. राऊत दररोज सकाळी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा बाण सोडत असल्याने राऊतांवर अनेकदा टीका झाली. मात्र, राऊत हे काय मागे हटले नाहीत.

दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दीड वर्षापूर्वी भाजपबरोबर असणारी युती तोडत 'आरजेडी'शी महागठबंधन करीत पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार असंतसं दीड वर्ष टिकलं. यादरम्यानच्या काळात तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे मोदी सरकारवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाले. तेजस्वी यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती.

हा टीका करतानाचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओची पोस्ट भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी 'एक्स'वर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'तेजस्वी यादव बिहारचे संजय राऊत (Sanjay Raut) ठरले', असे लिहीत त्यांनी टोला लगावला आहे.

भातखळकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील व्हिडीओत तेजस्वी यादव हे असं म्हणताना दिसत आहेत की, "लाइन में रहो, ठंडा दिया जाएगा," असा इशारा त्यांनी थेट अमित शाह यांना दिला होता. आता या त्यांच्या विधानावरून भातखळकर यांनी तेजस्वी यादव यांना डिवचलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT