Mla Ganpat Gaikwad sarkarnama
मुंबई

Kalyan News : आमदार गायकवाड यांच्या बंधूच्या कार्यालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण; नेमकं काय घडलं?

Mla Ganpat Gaikwad News : आमदार गायकवाड यांच्या बंधूच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस तपास करत आहेत.

Bhagyashree Pradhan

आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) यांचे बंधू अभिमन्यू गायकवाड यांच्या श्री साई केबल कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. ( mla ganpat gaikwad brother tisai cable office vandalized kalyan )

काही दिवसांपूर्वी आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर आमदार गायकवाडांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे पाच जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच आमदार गायकवाड यांच्या बंधूच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी सांगितल्यानुसार, "श्रीसाई केबल कार्यालयासमोर एका कर्मचाऱ्याची दुचाकी उभी होती. या दुचाकीजवळ दोन युवक आले. मात्र, हे दोघेजण चोरी करत असल्याच्या संशयावरून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. याचा राग आल्यानं दोघेजण थेट कार्यालयात घुसले. युवकांनी आपल्या काही मित्रांना बोलावून कर्मचाऱ्यांना मारहाण करत कार्यालयाची तोडफोड केली."

या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिस करत आहेत, अशी माहितीही राजेश शिरसाठ यांनी दिली.

दरम्यान, आमदार गायकवाडांनी महेश यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर कल्याण पूर्व येथे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. त्यामुळे कार्यालय तोडफोडीच्या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT