Kalyan News : शिवसेना नेत्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांची आता कोंडी होताना दिसत आहे. रस्त्याच्या भूमिपूजनादरम्यान एका शाळेतील पालक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आमदार गायकवाड यांचे समर्थक संदीप तांबे आणि अन्य दोन जणांच्या विरोधात पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. (MLA Ganpat Gaikwad News)
कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावह गोळीबार केला होता. या घटनेनंतर गायकवाडांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 14 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. आमदार गायकवाड हे सध्या तळोजा येथील कारागृहात आहेत.
गोळीबाराच्या आदल्यादिवशी कल्याण पूर्वेतील नूतन विद्यामंदिर शाळेच्या समोरच्या जागेत रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा रस्ता गायकवाडांच्या आमदार निधीतून करण्यात येत असल्याने त्या ठिकाणी ते स्वत: आले होते. मात्र, स्थानिकांनी भूमिपूजनास विरोध करीत जागा चर्चची असल्याचे सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी भाजप (BJP) कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता कोलसेवाडी पोलिसांकडून संदीप तांबे यांना माहिती देण्यात आली आहे की, त्यांच्यासह अन्य दोन जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप समर्थकांच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
(Edited By - Rajanand More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.