Thane News : 'कल्याण पूर्व येथील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत पालिका आयुक्तांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्याचा पाठपुरावादेखील केला. मात्र, पालिका आयुक्तांनी केलेल्या पाहणीवेळी आम्हाला साधी कल्पनाही न देता, एका पदाधिकाऱ्यास सोबत घेऊन गेले,' असं सांगत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.
तसेच, त्यामुळे कुठे तरी प्रशासन राजकारण करत नाही ना? असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला. त्यामुळे रस्त्यांच्या कामावरून पुन्हा एकदा कल्याणमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्यांना वाचा फोडली. यावेळी पाण्याच्या टाकीचा प्रश्न असो अथवा रस्त्याच्या दुरवस्थेबाबतच्या प्रश्नावर आमदार गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत, कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामकाजावर नाराजीदेखील व्यक्त केली.
तसेच कल्याण (Kalyan ) पूर्व भागातील मुख्य रस्त्यांसह मलंगगड रोडवरील डोरली गाव रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत पालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून ही बाब निदर्शनास आणून दिली. या रस्त्यांच्या दुरुस्तीसह व सिलकोट करण्याची मागणी करीत, त्याचा वारंवार पाठपुरवा करण्यात येत आहे. असे असताना, पालिका आयुक्त यांनी केलेल्या पाहणी दौऱ्याच्या वेळी आम्हाला साधी कल्पनाही न देता, एका पदाधिकाऱ्यासोबत घेऊन जात पाहणी करीत असल्याची बाब गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिली.
तसेच त्या ठिकाणी तो पदाधिकारी स्वत:चे फलक लावून कामे आम्ही केल्याचे भासवत असल्याचेदेखील सांगत, गणपत गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडपणे नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, यावर पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी फलकबाजी करणे हा जिल्हा नियोजन समितीचा विषय होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा नियोजन समितीत आराखड्यावर चर्चा होणे अपेक्षित असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. यानंतर गायकवाड यांनी आक्रमक होत, माझे म्हणणे ऐकून घ्या, असे म्हटले.
याशिवाय पत्रव्यवहार मी केला असताना, मला न बोलावता, ज्याचा पत्रव्यवहारदेखील नाही त्यांना घेऊन जात पाहणी करीत असल्यावर आक्षेप नोंदविला. त्यामुळे कुठे तरी, प्रशासन राजकरण करत नाही ना? असा आरोपदेखील गायकवाड यांनी केला. त्यामुळे रस्त्यांच्या कामावरून पुन्हा एकदा कल्याणमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.