Ganpat Gaikwad, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

MLA Ganpat Gaikwad : आमदार गोळीबार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी यांनी दिला 'हा' आदेश

Devendra Fadnavis : कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरण भोवणार

Avinash Chandane

Kalyan Crime News :

कल्याण पूर्वेकडील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची राज्यात चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने कायदा हातात घेतल्याने आता त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्त्वाचा आदेश दिला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचा मित्र राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. शुक्रवारी रात्री ही घटना उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात घडल्याने खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश पोलिस महासंचालकांना दिला आहे. कायद्यासमोर सगळे समान आहेत.. कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. गोळीबाराची घटना पोलिस स्टेशनमध्ये का घडली, यामागील सत्य शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

जमिनीच्या वादातून गेले काही दिवस उल्हासनगरच्या द्वारली गावात भाजप (BJP) आमदार गणपत पाटील आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यात वाद सुरू होता. त्यातून आमदार गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

आमदार गणपत गायकवाडांनी (Ganpat Gaikwad) महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल यांच्यावर एकूण सहा राऊंड फायर केले. त्यातील दोन गोळ्या महेश गायकवाड यांच्या अंगाला चाटून गेल्या तर दोन गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या. इतर दोन गोळ्या राहुल पाटलांना लागल्या आहेत. सध्या दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत काल शिंदे गटाकडून पुन्हा पाडण्यात आली. त्यानंतर हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहोचला होता.

तत्पूर्वी आमदार गायकवाड यांच्याविरोधात द्वारलीतील महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात जमिनीची घेतल्या पण त्यांचे पैसे दिले नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. शिवाय आमचे बँक स्टेटमेंट चेक करा, असेही आव्हान आमदार गणपत गायकवाडांना देण्यात आले होते. तर आमदार गायकवाडांनी महिलांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT