Ganpat Gaikwad Firing Update : गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; आमदार गायकवाड पोलिसांच्या ताब्यात, रिव्हाॅल्व्हरही जप्त

BJP MLA Ganpatrao Gaikwad Firing Case : पोलिस ठाण्यातच केलेल्या गोळीबारामुळे मोठी खळबळ
Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad
Ganpat Gaikwad, Mahesh GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli News : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. भाजप आमदाराने थेट पोलिस ठाण्यातच केलेल्या गोळीबारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड (Ganpatrao Gaikwad) यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले. सलग तिसऱ्या दिवशीही आमदार गणपत गायकवाड चर्चेत आले असून आता शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला आहे. आता या गोळीबारप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेत वापरण्यात आलेले रिव्हाॅल्व्हर देखील जप्त केले आहे. जवळपास दोन तास उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात त्यांना बसवून ठेवले आहे.

Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : मोठी बातमी! भाजप आमदार गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर पोलिसांसमोरच गोळीबार

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली. त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला.

या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यावेळी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण आहेत महेश गायकवाड ?

महेश गायकवाड हे कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक आहेत. 2015 साली झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेना फुटली आणि शिंदे गट वेगळा झाला. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातून उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) समर्थन देणारे महेश गायकवाड हे पहिलेच होते.त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेचे ते निकटवर्तीय समजले जातात. कोव्हीड काळात त्यांनी अनेकांना मदत केली आहे.

हीच बाब गायकवाडांच्या जीवावर....

दोन दिवसांपूर्वी काही महिलांनी व्हिडिओद्वारे आमदारांवर आरोप केले होते. हा वाद द्वा गावातील जमिनीचा होता. यामध्ये गणपत गायकवाड यांनी महिलांची जमीन खरेदी करत विकासकांना दिली होती. मात्र, त्या महिलांना कोणतेही पैसे दिले नव्हते असा आरोप या महिला करत होत्या. त्यानंतर आमदारांनी या महिला खोटं बोलत असल्याची प्रतिक्रिया सरकारनामाशी बोलताना दिली होती. मात्र, हेच प्रकरण गोळीबाराचे कारण ठरले असल्याची जोरदार चर्चा आहे.

या महिलांची बाजू मांडण्यासाठी महेश गायकवाड मध्ये पडले होते. यासंदर्भात आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड हिललाईन पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये बसले असताना त्यांच्यात काहीतरी बोलणे सुरू होते. याचवेळी आमदारांनी महेश गायकवाड आणि त्यांचा मित्र राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : आमदार गायकवाडांनी 'या' कारणामुळे केला महेश गायकवाडांवर गोळीबार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com