MLA Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाडांना मस्ती आली कुठून?

Shivsena Mahesh Gaikwad Firing : आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे नातलग असून त्यांच्यात अनेक दिवसांपासून टोकाचा वाद..
MLA Ganpat Gaikwad
MLA Ganpat GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाच्या कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाडांवर शुक्रवारी रात्री गोळीबार केला. यात महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, आमदार गायकवाडांनी हिललाईन पोलिस ठाण्यातील वरीष्ठ पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्येच गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात एवढी मस्ती आली कुठून असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

MLA Ganpat Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : मोठी बातमी! भाजप आमदार गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर पोलिसांसमोरच गोळीबार

आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) हे नातलग असून त्यांच्यात अनेक दिवसांपासून टोकाचा वाद आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आमदार गायकवाडांचा मुलगा आणि महेश हे हिललाईन पोलिस ठाण्यात गेले होते. तेथे त्यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी आमदार गायकवाड तेथे आले आणि महेश गायकवाड यांच्या दिशेने सहा गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या महेश यांना घासून गेल्या, तर दोन शरीरात घुसल्या. तर दोन गोळ्या त्यांचे मित्र राहुल पाटील यांना लागल्या आहेत. आमदार गायकावाडांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षकांसमोरच गोळीबार झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

MLA Ganpat Gaikwad
Ajit Pawar : अजितदादांच्या मोठ्या हालचाली; जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात लवकरच भूकंप?

गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) सलग तिसऱ्या दिवशी वादामुळे चर्चेत आले आहे. गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आणि गुरुवारी असेल सलग दोन दिवस, दोन ठिकाणी महिलांना मारहाण केली आहे. त्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर तिसऱ्या दिवशी गोळीबार केला. यामुळे आमदार गायकवाडांना एवढी मस्ती आली कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, बुधवारी काही महिलांनी गायकवाडांवर जमीनी विकल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी महिलांना मारहाण केली होती. तसेच गुरुवारी पालिकेच्या सूचना नसतानाही एका शाळा परिसरात गायकवाडांनी रस्त्याच्या भूमिपूजनाचा प्रयत्न केला. त्यास विरोध केल्याने गायकवाडांनी नागरिकांनी मारहाण केली होती. त्यानंतर शुक्रवारी शिंदे गटाच्या कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाडांवर गोळीबार केला. सलग तीन दिवस गायकवाडांनी राडे केले असले तरी ते यापूर्वीही वादामुळे कायम चर्चेत राहिलेले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार गायकवाडांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्याने खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि त्यांच्यात वारंवार खटके उडाले आहेत. महायुतीत ज्याचा खासदार त्याची जागा, हा प्राथमिक फॉर्म्युला ठरलेला आहे. मात्र कल्याणमधून भाजपचा खासदार होणार, असे जाहीरपणे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे शिंदे समर्थक आणि आमदार गायकवाड यांच्यात कुरबुरी वाढल्या होत्या. यातच महेश गायकवाडांनी आमदारांवर टीकेची झोड उठवली होती. जुन्या भांडणातून पोलिस ठाण्यातच केलेल्या गोळीबारामुळे आमदार गणपत गायकवाडांवर राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

MLA Ganpat Gaikwad
Uddhav Thackeray On Tatkare : 'घराणेशाही नको म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी आता तटकरेंना...'; ठाकरेंची तोफ धडाडली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com