manda mhatre devendra fadnavis ganesh naik.jpg sarkarnama
मुंबई

Manda Mhatre Vs Ganesh Naik : गणेश नाईकांची 'ती' फाईल मंदा म्हात्रे बाहेर काढणार, नेते फडणवीसांनाही आवरेना!

Akshay Sabale

नवी मुंबईतील भाजपत असलेल्या दोन आमदारांमध्ये सुरू असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. कोविड काळातील सर्व फाइल्स आपल्याकडे आहेत. या काळात कोणत्या कंत्राटात किती रूपये लुटले, हे सर्व बाहेर काढीन, असा इशारा मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना दिला आहे.

मंदा म्हात्रे ( Manda Mhatre ) यांनी गणेश नाईक यांना उघड-उघड इशारा दिल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे.

मंदा म्हात्रे काय म्हणाल्या?

नवी मुंबईतील नियोजित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच मंदा म्हात्रे बोलत होत्या. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या कामात अडथळा निर्माण केल्यास तीव्र आंदोलन करणार, असं देखील म्हात्रे यांनी नाईक ( Ganesh Naik ) यांना ठणकावून सांगितलं आहे.

"कोविड काळातील सर्व फाईल्स आपल्याकडे आहेत. या काळात कोणत्या कंत्राटात कोणी किती पैसे लुटले हे बाहेर काढीन. माझ्या कामात कोणी आडवे याल तर भांडाफोड करेन," असा इशारा मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना दिला आहे.

"नवी मुंबईतील समाजासाठी यांनी काहीही केले नाही. आता 14 गावांच्या नवी मुंबईतील समावेशालाही ते विरोध करतील. स्वत: काम करायचं नाही आणि मी काम करायला गेले की त्यात खो घालायचा. पालिकेनं निधी दिला नाही म्हणतात. मग तुम्ही काय करत होतात. तुम्ही तर पालकमंत्री होतात. तुम्हाला का निधी आणता आला नाही," असा सवाल मंदा म्हात्रे यांनी नाईक यांना विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT