Video Devendra Fadnavis : शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, देवेंद्र फडणवीसांचा दावा

Devendra Fadnavis Shivaji Maharaj MP shahu maharaj: देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत काँग्रेसच्या लोकांनी शिकवले की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटली नव्हती.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआकडून आज (रविवारी) आंदोलन करण्यात आले. हुतात्मा स्मारक ते गेट वे असा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनातून महायुती सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली.

महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर देताना काँग्रेसनेच शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती. मात्र, काँग्रेसने ते लोकांना इतके वर्ष शिकवले, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत काँग्रेसच्या लोकांनी शिकवले की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटली नव्हती. सुरतच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे लावला. शिवाजी महाराजांचा येवढा सन्मान तेथे होता. तरीसुद्धा काँग्रेसने शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असे शिकवले. याची माफी ते मागणार आहेत का?

शिवाजी महाराज यांचा जो सातत्याने अपमान केला त्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जगामध्ये जे शिवप्रेमी आहेत त्यांची माफी मागावी, असे देखील फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : "कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने..."; 'मविआ'च्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया, ठाकरे-पवारांवर प्रश्नांची सरबत्ती!

शाहु महाराजांचे प्रत्युत्तर

पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआकडून हुतात्मा स्मारक ते गेट वे असा मोर्चा काढला होता. या मोर्चात काँग्रेसचे खासदार शाहु महाराज छत्रपती सहभागी झाले होते. त्यांनी ' आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी इतिहास लिहिला आणि कोणी इतिहास शिकवला याचे संशोधन करा, या शब्दांत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले.

भाजपचे 'मविआ' विरोधात आंदोलन

पुतळा कोसळल्याने महाविकास आघाडीकडून आंदोलन केले जात असताना भाजपकडून देखील महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असताना आंदोलन कसले करता. असा सवाल देखील या आंदोलनातून विचारण्यात आला.

Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : पंतप्रधानांच्या माफीत मगरूरी; सरकारविरोधात उद्धव ठाकरेंचा 'गेट आऊट ऑफ इंडिया'चा नारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com