Mumbai News: पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आदेशामुळे मिरा-भाईंदरमधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर भूखंड लाटण्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा आरोप होत आहे.
अशातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पत्रावर नरेंद्र मेहता यांचा 'भूमाफिया' असा उल्लेख केला आहे. हे पत्र व्हायरल झाल्याने विरोधकांना सत्ताधारी भाजपवर टीका करण्याचे आयते कोलीत मिळाले आहे. या पत्रामुळे मेहता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात नाकारता येत नाही. त्यांची चौकशी होण्याचे संकेत आहे.
आदिवासी आणि अन्य समाजाच्या व्यक्तींच्या जमिनी मेहता यांनी लाटली आहे. त्यावरील कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा आरोप होत आहे. सरकारची जवळपास 400 ते 500 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप मेहता यांच्यावर करण्यात आला आहे.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी सरकारी पत्रावर भाजपच्या आमदारांचा उल्लेख 'भूमाफिया' असा केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे पत्र माध्यमांसमोर उघड केले आहे. 'भूमाफिया' असा उल्लेख असलेल्या या पत्रावरुन पटोले-बावनकुळे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
महसूल खात्यानं हे पत्र 20 जून 2025 रोजी पाठवले आहे. या पत्रात “भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रक्कमेची पर्यायाने शासनाच्या थकित महसूलाची जलद वसूली करणेबाबत” असा उल्लेख करत 7 दिवसांमध्ये चौकशी करून व सदर विषयाबाबत काय करण्यात आली याची माहिती द्यावी असे म्हटले आहे. या पत्रावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे.
हे पत्र आता पटोले हे सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत. तर दुसरीकडे पटोले हे मेहता यांचे नाव घेऊन राजकारण करीत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. 'मंत्री म्हणून काम करताना जो विषय तक्रारदाराकडून येतो त्या विषयाला धरून आपण लिहितो, यात आमदार कुठेही लिहिलेले नाही. नरेंद्र मेहता यांचं नाव लिहिलेलं आहे,' असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे.
नाना पटोले यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आमची कोणतीही थकबाकी नाही. माझ्यावरील आरोप हे मोघम आहेत, मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, असा खुलासा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.