MNS News: तीन मराठी कलाकार बनले मनसैनिक; राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

Bharat Jadhav, Pushkar Shrotri and Kedar Shinde join MNS: राज ठाकरे अनेक वर्षांपासून मुंबईसाठी चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विविध अभियानांमध्ये सहभागी होण्याची आपली तयारी कायम असते. त्यांना पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे.
Bharat Jadhav, Pushkar Shrotri and Kedar Shinde join MNS
Bharat Jadhav, Pushkar Shrotri and Kedar Shinde join MNSSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मराठी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील तीन प्रसिद्ध कलाकारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (Maharashtra Navnirman Sena) प्रवेश केला आहे. प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, तसेच दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, केदार शिंदे यांच्या मनसे प्रवेशाच्या वेळी भरत दाभोळकर हे देखील होते. उपस्थित होते. यावेळी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि नेत्या शालिनी ठाकरेही उपस्थित होत्या.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन रायगडाच्या पायथ्याखाली साजरा करण्यात आला. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यभरात सदस्य नोंदणीची मोहीम राबवण्याची सूचना केली. त्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी मनसेत प्रवेश केला.

Bharat Jadhav, Pushkar Shrotri and Kedar Shinde join MNS
Pune News: पुणेकरांनो, तुम्ही शिवाजीनगर, पेठांमध्ये जाणार असाल तर द्यावा लागणार प्रदूषण टॅक्स! काय आहे नवा प्रस्ताव

"राज ठाकरे अनेक वर्षांपासून मुंबईसाठी चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विविध अभियानांमध्ये सहभागी होण्याची आपली तयारी कायम असते. जर एखादा व्यक्ती चांगले काम करत असेल तर त्याला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. एखाद्या पक्षात प्रवेश करण्यापेक्षा कधी कधी बाहेरूनही मार्गदर्शन करता येते. एखादी व्यक्ती पक्षात नसली तरीही ती योग्य मार्गदर्शन देऊ शकते, " असे भरत दाभोळकर म्हणाले.

Bharat Jadhav, Pushkar Shrotri and Kedar Shinde join MNS
Pune News : मसापमध्ये दहा वर्षांनी सत्तापालट! RSSच्या साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण अध्यक्षपदी; विद्यमान कार्यकारिणीचा पराभव

मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला कलाकारांच्या सहभागामुळे गती मिळत असल्याचे चित्र आहे. मनसेच्या प्रमुख मोहिमेत भाग घेणाऱ्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे जनतेचा भरपूर उत्साह पाहायला मिळत आहे. यामुळे पक्षाची सदस्यसंख्या वाढण्यास चालना मिळण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये पक्षाशी जोडणी मजबूत करण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com