Uddhav Thackeray, Nitesh Rane Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane Criticized Thackeray: 'जसा पक्षप्रमुख तसे त्यांचे नेते'; राणेंनी डिवचलं, उद्धव ठाकरेंही पदं विकतात..

Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray : अंधारेंची यात काही चूक नाही..

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Rane Criticism: ठाकरे गटाचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. बीडमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा या गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर जाधव यांचा हा दावा अंधारेंनी फेटाळून लावला आहे. (BJP mla Nitesh Rane Criticized Sushma Andhare Uddhav Thackeray)

या वादावर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी भाष्य करीत ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. 'जसा पक्षप्रमुख तसे नेते, अंधारेंची यात काही चूक नाही,' असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे. राणे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

"आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव यांनी काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडीओ जाहीर केला आणि फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि महाप्रबोधन यात्रेची दिनांक वीस तारखेला ग्रामीण महाराष्ट्रातील समारोपीय सभेला गालबोट लावण्यासाठी हा सगळा बनाव केला," असा आरोप अंधारे यांनी जाधव यांच्यावर केला आहे.

नितेश राणे म्हणाले, "नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर हाच आरोप केला होता. आमदारकी, शाखाप्रमुख ही पदं विकली जात होती आणि आताही तोच आरोप होत आहे, त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य आहे. कारण जसा पक्षप्रमुख तसे त्यांचे नेते. ठाकरेही पद विकत देतात. त्यामुळे अंधारे जे करत आहेत त्यात त्यांची काही चूक नाही,"

"उद्धव ठाकरे यांच्यावर बुकींग, खंडणी यांसारखे अनेक आरोप झाले आहेत. बीडमध्ये जे सुषमा अंधारेंसोबत घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं. कोणत्याही महिलेला मारहाण करणं हे चुकीचं आहे," असे राणे म्हणाले.

"सुषमा अंधारे आमच्यावर कोणत्याही भाषेत बोलल्या तरी त्या एक महिला म्हणून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे. परंतु जिल्हाप्रमुखांनी जे आरोप केले ते गंभीर आहेत. जिल्हाप्रमुख पद विकायला काढलं आहे. ऑफिसमधल्या एसीसाठीही पैसे मागितले.उद्धव ठाकरे लॉड्रीचा खर्चही करत नाहीत. ते ही लीला लॉड्रीत जातात. पटेल नावांचा व्यक्ती यांच्या गाड्यांची सर्व्हिसींग करतो. उद्धव ठाकरेंचा सर्व खर्च अनेक लोकं करतात," असा आरोप राणेंनी यावेळी केला.

राणेंनी यावेळी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. 'सामना'चा साधा संपादकही विमानातून फर्स्ट क्लासमधून प्रवास करतो, असं म्हणत त्यांनी राऊतांनाही डिवचलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT