Aditya Thackeray,  Nitesh Rane
Aditya Thackeray, Nitesh Rane sarkarnama
मुंबई

Nitesh Rane Statement : उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य यांनी मुख्यमंत्री होण्याचा कट रचला..; राणेंचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

BJP mla nitesh rane on aditya thackeray over cm charge : भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी आज (शनिवारी) ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला.

नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलत होते. त्यांनी खासदार संजय राऊत, माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राणेंनी आदित्य ठाकरेंची नक्कल करुन खिल्ली उडवली.

विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळी विधीमंडळाच्या पायऱ्यावर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे उद्देशून 'म्याव म्याव' असा आवाज काढून डिवचलं होते. त्यावर राणे यांनी राऊतांना सवाल केला.

"तुमच्या मालकाच्या मुलाला बघून जेव्हा मी 'म्याव म्याव' असा आवाज काढला होता. तेव्हा तुमच्या मालकांना बर्नोल का लावावं लागलं?, त्या रागापोटी दीड महिने माझ्यावर खोटी केस टाकून मला आत का टाकण्यात आलं?, तुमच्या मालकाचा मुलगा वाघाची डरकाळी देतो का?, मग त्यांना बघून म्याऊ म्याऊ न करता वाघाची डरकाळी फोडायची का?," असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे आजारी असताना मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु होत्या. या घडामोडींबाबत राणेंनी आज मोठा गौप्यस्फोट केला. राणेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केला. राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे हे मानेवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात दाखल होते. तेव्हा आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि त्यांची टोळी दाओसच्या नावाने मजा मारत होते,"

मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचलं..

"माझ्या वडिलांची तब्येत बरी होणार नाही, म्हणून आदित्य ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचलं. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे हे सर्व प्रकरण थांबलं," असा गंभीर आरोप नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर केला आहे. "उद्धव ठाकरेंचे आदेश त्यांच्या मातोश्रीवरील शिपाई सुद्धा मानत नाहीत. शिपाई सोडा आदित्य ठाकरे तरी त्यांचे आदेश मानतात का?," असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

ही माहिती खरी की खोटी?

नितेश राणे म्हणाले,"जसलोकच्या कुठल्या रूममध्ये बसून या सर्व बैठका पार पडायच्या. त्या बैठका सीसीटीव्हीसह दाखवू शकतो. म्हणून मोठ्या समर्थनाची गोष्ट करू नका. स्वत:चे वडील आजारी असताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु त्यांना समर्थन मिळवायला सांगा. ही माहिती खरी की खोटी?, हे संजय राऊतांनी विचारलं पाहिजे,"

म्याव-म्यावशी कोण लग्न करेल?

संजय राऊत यांनाही आजच्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी सल्ला दिला की, त्यांनी इतरांवर भाष्य करण्यापेक्षा आदित्य ठाकरेंचे लग्न कधी होणार यावर संपादकीय लिहायला सुरुवात करावी. कोणाशी लग्न करणार? म्याव-म्यावशी कोण लग्न करेल? असे राणे म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT