NCP MLA Amol Mitkari On Devendra Fadanvis  Sarkarnama
मुंबई

Amol Mitkari News: भाजप आमदारांची अमित शाहांकडे अजितदादांविषयी तक्रार; राष्ट्रवादीच्या मिटकरींचा मोलाचा सल्ला

BJP MLAs Ajit Pawar Complaint : प्रचंड बहुमतासह सत्तेत परतलेल्या महायुतीतही सगळंच आलबेल चालले नसल्याचं आता लपून राहिलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत मोठं विधान केलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : प्रचंड बहुमतासह सत्तेत परतलेल्या महायुतीतही सगळंच आलबेल चालले नसल्याचं आता लपून राहिलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत मोठं विधान करताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी एकही नेता संवाद साधण्यात चांगला नसल्याचं म्हटलं. यावरुन महायुतीतील भाजप आणि मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

याचदरम्यान, आता काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी त्यांच्याकडे तक्रार केल्याची चर्चा आहे. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी गुरुवारी(ता.29) भाजप आमदारांना मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी भाजप आमदारांना उतावीळपणापेक्षा जरा दमानं घ्या असं म्हटलं आहे. तसेच अमित शाहांकडे अजित पवारांची तक्रार घेऊन जाणाऱ्या भाजपा आमदारांना त्यांनी कानपिचक्या दिल्याचा दावा मिटकरींनी केला आहे.

नेमकं काय घडलं होतं..?

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आमदारासमोर पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचं काम मुद्दामहून अजित पवारांकडून सुरू आहे.तसेच पुढे होत असलेल्या 'स्थानिक'च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यांच्याकडून मुद्दाम भाजपची ताकद कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून महायुतीतील मित्रपक्षांवरील कुरघोड्यांना रोखण्यात यावं,अशी मागणी भाजप आमदारांनी अमित शाहांकडे केल्याची चर्चा आहे.

यावर अमित शाह यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत,असा उलट सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी भाजपच्या आमदारांना तुम्ही अजित पवारांची तक्रार करु नका,आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचं असल्याचंही अमित शाह यांनी ठणकावलं.

तसेच महायुतीत आपल्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असून मागे न हटता प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे तुमच्या भागातील कामांचा पाठपुरावा करा. याउलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशा सूचनाही अमित शाह यांनी दिल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.तसेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदावर संधी मिळाली. पण या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारमध्ये वारंवार खटके उडत आहे. याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत मोठं विधान करताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी एकही नेता संवाद साधण्यात चांगला नसल्याचं म्हटलं आहे. याचे पडसाद आता महायुतीत उमटू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT