Vaishnavi Hagawane: CM फडणवीसांकडून वैष्णवीच्या कुटुंबियांची मोठी मागणी मान्य; 'या' खतरनाक सरकारी वकिलाची एन्ट्री; हगवणे कुटुंबाची झोप उडणार

Pune Crime News : वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी आर आर कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहेत. फडणवीसांनी दूरध्वनीवरून कस्पटे कुटुंबियांशी संवाद साधताना सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
Vaishnavi Hagvane case update
Vaishnavi Hagvane case updateSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणावरुन संपूर्ण राज्याला धक्का बसला होता.तसेच सुनेला त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झालेल्या हगवणे कुटुंबाविरोधात संतापाची लाट उसळली होती.अशातच आता वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या वकिलाविरोधात एका खतरनाक सरकारी वकिलाची एन्ट्री झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात वैष्णवीच्या कस्पटे कुटुंबियांची मोठी मागणी मान्य केली आहे.

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांशी दूरध्वनीवरील संपर्कादरम्यान केली होती. आता सरकारकडून वैष्णवी हगवणे प्रकरणात आर. आर. कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी आर आर कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहेत.CM फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दूरध्वनीवरून कस्पटे कुटुंबियांशी संवाद साधताना सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार या प्रकरणात सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कावेडिया यांच्याकडे अनेक मोठे मोठे खटले हाताळण्याचा अनुभव आहे. तसेच गुन्हेगारी विश्वात कावेडिया यांची मोठा दरारा आहे. कावेडिया यांच्या एन्ट्रीमुळे हगवणे कुटुंबाची झोप उडणार असल्याची चर्चा आहे.

Vaishnavi Hagvane case update
Mahayuti Government News: फडणवीस सरकारचा आणखी एक धडाकेबाज निर्णय; येत्या 1 जूनपासून सरकारी कार्यालयात 'या' फाईल्सला 'नो एन्ट्री'

तसेच आरोपी हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी बुधवारी(ता.28) वैष्णवीच्या चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच हगवणे कुटुंबाचा बचाव करतानाच कस्पटे कुटुंबियाविषयी गंभीर विधानं केली होती.यानंतर दुशिंग यांच्याविषयी समाजात चीड निर्माण झाली असतानाच आता सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची एन्ट्री झाल्यानं पुणे न्यायालयात युक्तिवादादरम्यान दोन्ही वकिलांदरम्यान कडवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे,दीर सुशील हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे,सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे. यावेळी करिष्मा हगवणेनं जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Vaishnavi Hagvane case update
Vaishnavi Hagawane: '...तर ती गाडी पेटवण्याची धमकी!'; वैष्णवीच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा; पत्रकार परिषदेतच ढसाढसा रडले

वैष्णवीची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा आणि पती शशांक यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.त्यांना जामीन मिळू नये अशी अपेक्षा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी बोलून दाखवली आहे.

हगवणे कुटुंबाच्या अडचणी

वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबाची एक एक धक्कादायक कारनामे समोर येऊ लागली आहे.यात पिस्तुल परवाना मिळवण्यासाठी खोटा पत्ता दिल्यानंतर आता हगवणे कुटुंबावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com