Eknath Shinde Naresh Maske Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Bjp New Mumbai Party Leader News : नरेश म्हस्केंना उमेदवारी;ठाण्यात 65 भाजप पदाधिकार्‍यांचे राजीनामे; CM शिंदेंवरही आरोप

Chaitanya Machale

Thane News : ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. या प्रकारामुळे नाराज झालेल्या नवी मुंबईतील तब्बल 65 माजी नगरसेवरांनी आपले राजीनामे दिले आहेत. कल्याण लोकसभेची जागा सेफ करण्यासाठी ठाण्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली असल्याचा खळबळजनक आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

शिवसेनेने म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या एकूण 539 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पेलावे लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून महायुतीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातील पेच कायम होता. या मतदारसंघातून महायुतीमध्ये सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होती. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने या जागेवर दावा सांगितला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघाचा तिढा सुटत नसल्याने उलटसुलट चर्चा देखील सुरू झाली होती. अखेर या मतदारसंघातून शिवसेनेने नरेश म्हस्के यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. म्हस्के यांच्या पेक्षा प्रबळ उमेदवार या मतदारसंघात भाजपकडे होता. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या (BJP) उमेदवाराला द्यावा, अशी आग्रही मागणी केली जात होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत शिवसेनेने म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने भाजप पदाधिकारी चांगलेच नाराज झाल्याचे पहायला मिळत आहे.

या मतदारसंघात उमेदवारीबाबत बैठका होत असताना सांगण्यात आले होते की, कोणत्याही परिस्थितीत भाजपला ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडला जाईल. या मतदार संघातून भाजपचे संजीव नाईक हे एकमेव उमेदवार इच्छुक होते. या मतदारसंघात समावेश असलेल्या चार विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक असल्याने हा मतदारसंघ भाजपला मिळेल, अशी खात्री वाटत होती. मात्र अचानकपणे शिवसेनेने महायुतीचे उमेदवार म्हणून माजी महापौर म्हस्के यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. कल्याणच्या जागेसाठी तडजोड म्हणून ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप आता भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

मुलासाठी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी या जागेसाठी तडजोड केली असून ठाण्यात किरकोळ उमेदवार दिल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. म्हस्के महापौर जरी असले तरी त्यांचे त्यांच्या वॉर्डाच्या बाहेर काहीच चालत नाही, असे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी कल्याणच्या जागेसाठी वाटाघाटी केल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कल्याणमध्ये किरकोळ उमेदवार दिला. तिथे प्रचार न करता आपला मुलगा निवडून आला पाहिजे. त्याची परतफेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT