Amol Kolhe on PM Modi : शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा; अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Sharad Pawar And Maharashtra : पवारांनी 72 कोटींंची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती. त्यातून चार कोटी शेतकऱ्यांचा साताबारा कोरा केला होता. देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्याचे काम त्यांनी केले होते.
Narendra Modi, Amol Kolhe
Narendra Modi, Amol KolheSarkarnama

Satara Lok Sabha News : सातारा लोकसभेची निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतली आहे. तशीच परिस्थिती बारामती, शिरुरमध्ये व देशातही आहे. दहा वर्षांत भाजपने केलेली फसवणूक, वाढलेली महागाई, त्यामुळे सर्वसाामन्य जनतेने निवडणूक हाती घेत दहा वर्षात झालेला मोदी सरकारकडून झालेला अपेक्षाभंग, मोजक्या उद्योगपतींचे धार्जिने हे सरकार घालविण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेंना प्रचंड पाठींबा स्वाभिमानी सातारकर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे उमेदवार व स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe हे गुरुवारी (ता. 2) आमदार शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांच्या वाई तालुक्यातील पाचवड, करहर व रहिमतपूर येथे जाहीर सभा झाल्या. यामध्ये त्यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली.

पवार महाराष्ट्राचा आत्मा

मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांचा Sharad Pawar भटकता आत्मा असा उल्लेख केला होता. यावर डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, पंतप्रधान पद हे मोठे असून त्यांना या पदाचा विसर पडला आहे. शरद पवार हे महाराष्ट्रासाठी अस्वस्थ होतात. मोदींच्या गुजरातमध्ये भूकंप झाला त्यावेळी आपत्ती निवारणासाठी त्यांनी गुजरातमध्ये जाऊन पुढाकार घेतला होता.

पवारांनी 72 कोटींंची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती. त्यातून चार कोटी शेतकऱ्यांचा साताबारा कोरा केला होता. देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्याचे काम त्यांनी केले होते. हाच तो अस्वस्थ आत्मा होता, ज्यांनी महिलांना संरक्षण दलात 18 टक्के , स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना 33 टक्के आरक्षण दिले. ते सर्वसामान्य जनतेसाठी अस्वस्थ होत असतील तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे,असेही कोल्हेंनी स्पष्ट केले.

Narendra Modi, Amol Kolhe
Prakash Ambedkar On BJP : 'चारशे पार'वरुन आता दोनशेवरच! स्थानिक पक्षांनीच भाजपची हवा काढली; आंबेडकरांचा टोला

आढळराव हे डमी उमेदवार....

शिरुर लोकसभेतील वातावरणाबाबत अमोल कोल्हे म्हणाले, सध्या माझ्या समोरचे उमेदवार हे डमी उमेदवार असून ते उद्धव ठाकरे साहेबांशी धोका देऊन गद्दारी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते. या मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदेंच्या मनातही ते पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते. त्यामुळे स्वार्थासाठी ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे ते डमी उमेदवार असून त्यांनी स्वार्थासाठी कोलांटा उड्या मारलेल्या आहेत. सर्व सामान्य जनतेसाठी मी लढत देत आहोत. माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेचा मला विश्वास असल्यानेच मी बाहेरच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. तसेच पवार साहेबांचा, उद्धव ठाकरेंचा विचाराच्या स्वाभिमानासाठी माझी लढत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi, Amol Kolhe
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

इंडिया आघाडीचे 36 खासदार विजयी होतील....

महाविकास आघाडीचे राज्यात दहा उमेदवार लोकसभा लढत आहेत, नेमका काय निकाल असेल, यावर भाष्य करताना अमोल कोल्हे म्हणाले, राज्याचे वातावरण सत्ताधाऱ्यांनी दूषित केले असून कांदा, दूध उत्पादक शेतकरी प्रचंड नाडला गेला आहे. पीक विमा किती जणांना मिळाला असा प्रश्न करुन ते म्हणाले, शेतकरी विरोधी, युवकांच्या भवितव्याला हरताळ फासण्याचे काम या सरकारने केले आहे. अनेक मोठे प्रकल्प डोळ्यादेखत महाराष्ट्रातून पळविले गेले. तेही गुजरातला गेले आहेत. याविरोधात महाराष्ट्रातील जनता असून त्यामुळे इंडिया आघाडीचे किमान 35 ते 36 खासदार निवडून लोकसभेत जातील, असा विश्वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Narendra Modi, Amol Kolhe
Brij Bhushan Singh : मोठी बातमी! महिला कुस्तीपटूचं प्रकरण ब्रिजभूषण सिंहांना भोवलं; भाजपनं तिकीट कापलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com