Alleged BJP party office and storage setup on toilet premises in Borivali sparks controversy in Mumbai. Sarkarnama
मुंबई

BJP News : मुंबईत महापालिकेच्या शौचालयांवर भाजपचा डल्ला : आमदार निधीतून बांधलं पक्ष साहित्यासाठी गोडावून अन् सुसज्ज हॉल

BJP News : बोरीवलीतील अक्सर गावात शौचालयासाठी मंजूर जागेवर भाजपने कथित गोडाऊन आणि पक्ष कार्यालय उभारल्याचा आरोप आहे. साम टीव्हीच्या इन्वेस्टिगेशनमुळे प्रकरण चर्चेत आले आहे.

Hrishikesh Nalagune

BJP News : मुंबईत शौचालयाच्या जागेवर भाजपने चक्क पक्ष साहित्य ठेवण्यासाठी गोडावून वजा पक्ष कार्यालयच उभं केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील बोरिवली भागातील अक्सर गावात साम टीव्हीने इन्वेस्टिगेशन करत हा प्रकार समोर आणला आहे. यात 18 शौचालय उभी करण्यास मंजूरी असताना नूतनीकरण करतानाा फक्त 8 शौचालय ठेवून राहिलेल्या 10 शौचालयांची जागा हडपण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईकरांच्या सुविधेसाठी महापालिकेनं जागोजागी स्वच्छ आणि सुलभ शौचालय उभारली. त्यापैकीच हे 18 युनिट्स एक सुसज्य एक सुलभ शौचालय बोरिवलीतल्या अक्सर गावत उभं राहिलं. काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार मनीषा चौधरींच्या आमदार निधीतून याच नूतनीकरण झालं. तसा बोर्डही या शौचालयावर झळकत आहे.

नूतनीकरणात 10 शौचालयांच्या जागेवर डल्ला मारण्यात आला. या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे पुरावेच साम टीव्हीच्या हाती लागलेत. या शौचालयाच्या तळमजल्यावर 11 पैकी आठ शौचालय तशीच ठेवण्यात आली आणि उर्वरित 3 शौचालयांच्या जागेवर पक्षाचं साहित्य ठेवण्यासाठी चक्क गोडाऊन करण्यात आलं.

या गोडाऊनमध्ये आत गेल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. साम टीव्हीची टीम जेव्हा या शौचालयाच्या आतमध्ये गेली तेव्हा खळबळजनक चित्र पाहायला मिळालं. या गोडाऊनमध्ये भाजपच्या प्रचाराचं साहित्य ठेवण्यात आलं होतं. इथं मोठ्या प्रमाणात बॅनर्स आणि झेंडे हे देखील पाहायला मिळाले.

शौचालयाच्या वरच्या मजल्यावरील सर्वच्या सर्व ७ शौचालय गायब करून त्या ठिकाणी एखाद्या समाज मंदिरालाही लाजवेल असा एक सुसज्ज हॉल तयार करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातल्या रहिवाशांची गैरसोय तर होतेच आहे मात्र जे काही थोडेफार शौचालय शिल्लक आहेत ती देखील अक्षरशः किळसवाण्या अवस्थेत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

साम टीव्हीने या संदर्भात भाजप पदाधिकारी शशिकांत कदम यांच्यासोबत संपर्क साधला. ते म्हणाले, गावात या शौचालयात जाणाऱ्यांची संख्याच मिनिमम 10 फॅमिली असेल, ती पण खूप झाली. वरती जे आहे ते महिला आधारभवन आहे. महानगरपालिकेच्या ज्या ज्या योजना येतात, त्या सर्वांसाठी एक फॉर्म सेंटर असावं म्हणून बांधण्यात आलं आहे. इथं सर्व फॉर्म भरून घेतले जातात, असे त्यांनी स्पष्ट केलं.

या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मनसेना दिला आहे. मनसे पदाधिकारी किरण नकाशे म्हणाले, आज अशी परिस्थिती आली आहे की लोकांच्या जमिनी खाल्ल्या, गार्डन खाल्ले, शौचालय खाल्ले आणि शौचालयाची जागा पण खाल्लीत. त्यातही मुंबई महानगरपालिकेचे ते शौचालय आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा बोर्ड नाही. आमदार महोदयांनी स्वतःचा एवढा मोठा बोर्ड लावून ठेवला.

भाजपच गोडाऊन करायला तुम्ही शौचालयाची जागा वापरता का? असा सवाल करत मारामारी कशी करायची हे आम्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलं माहिती आहे पण लोकांचा आणि महिलांचा रिस्पेक्ट ठेवायचा म्हणून मी आता काहीच बोलत नाही. याच्यावर जी काय कायदेशीर कारवाई करता येईल ती आम्ही करणरच आहोत, पण यांना मी धडा शिकवणार एवढं मात्र नक्की, असा इशारा त्यांनी दिला.

सार्वजनिक व्यवस्था ही सामान्य माणसाच्या सोयीसाठी असते. मात्र शौचालय नूतनीकरणाच्या नावाखाली आणि तेही आमदार निधीतून पक्षाचं कार्यालय थाटणं इतपत योग्य आहे? आणि दिवसाढवळ्या शौचालयाच्या जागेवर मारलेला हा डल्ला महापालिकेला अजून कसा दिसला नाही? हे आणखीन एक मोठा आश्चर्य आहे. सत्ताधारी भाजपच्या आमदारानं केलेल्या या कारनाम्याविरोधात महापालिका कारवाई करणार का? हे बघण महत्त्वाचं असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT