Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

BJP News : बहुमत हुकलं तर भाजपचा 'प्लॅन बी' काय? अपक्षांसाठी मोठी फिल्डिंग; फडणवीसांनी 'या' 6 नेत्यांवर सोपवली जबाबदारी

Assembly Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींचं काही करुन महाराष्ट्राची सत्ता मिळवणं हेच ध्येय आहे. त्यासाठी प्रचारातही दोन्ही बाजूने पूर्ण ताकद लावण्यात आली होती. आता अपक्ष आणि बंडखोरांना आपल्याकडे वळविण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : संपूर्ण देशासह राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता काही तास उरले आहे. यंदाची निवडणूक महाराष्ट्रासाठीच नव्हे तर अनेक सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीनं पूर्ण जोर लावल्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. एक्झिट पोलमध्ये युती आणि आघाडी असं दोन्हींमध्ये 'टफफाइट'चे संकेत दिले होते.त्याचमुळे महाविकास आघाडीसह महायुतीनेही आपला 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. Maharashtra Election Assembly 2024 Result news

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election 2024 result live news या निवडणुकीत अपक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलमध्ये अपक्ष युती व आघाडीची झोप उडवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्ष,मनसे,वंचित,रासप, प्रहार, स्वराज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांसह अपक्षांसाठी अच्छे दिन येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर जर समजा बहुमतापासून दूर राहिलो तर महायुतीने घटक पक्षांची मोट बांधण्याचा प्लॅन बी तयार ठेवल्या असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीकडून छोट्या घटक पक्षांसह अपक्षांशी संपर्क करण्यासाठी सहा प्रमुख,संयमी आणि डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असलेल्या अशा 6 नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

भाजपनं (BJP) बंडखोर आणि अपक्ष विजयी होणाऱ्या उमेदवारांना गळाला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यात मंत्री रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर,संजय कुटे,नितेश राणे आणि निरंजन डावखरे, मोहित कंबोज यांच्यावर विजयी अपक्ष आमदारांशी संपर्क करण्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींचं काही करुन महाराष्ट्राची सत्ता मिळवणं हेच ध्येय आहे. त्यासाठी प्रचारातही दोन्ही बाजूने पूर्ण ताकद लावण्यात आली होती. आता अपक्ष आणि बंडखोरांना आपल्याकडे वळविण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. यात नेमकं कुणाला कितपत यश येतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यात राज्यात महायुतीला 150 -160 जागा तर महायुतीला 125-130 दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलमध्ये अपक्षांना 20 ते 25 दरम्यान जागा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.तर पोल डायरीमध्ये मनसे, वंचित, एमआयएमसह अपक्षांच्या पारड्यात 12-29 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT