Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आपली सत्ता येणार असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. या नेत्यांचे दावे किती खरे किती खोटे याची स्पष्टता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बुधवारी सकाळी होणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार या वेळेस गेल्या 30 वर्षानंतर विक्रमी मतदान झाले आहे.
1995 साली राज्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास 71 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 1999 ते 2024 या मधल्या मतदानाचा टक्का काही प्रमाणात घसरला होता. विशेष म्हणजे 2019 साली झालेल्या निवडणुकीत 61 टक्के इतके मतदान झाले होते. या निवडणुकीत मात्र टक्केवारी वाढली आहे, जवळपास चार टक्के मतदान वाढले असल्याने हे वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार याची उत्सुकता लागली आहे.
राज्यातील 288 पैकी काही मतदारसंघातील आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर काही मतदारसंघातील आकडेवारीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागून राहील आहे. सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात झाले आहे. करवीरमध्ये 84.79% मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदान मुंबईतील विधानभवन असलेल्या कुलाबा मतदारसंघात झाले आहे. कुलाबा मतदारसंघात 44.49 % इतके सर्वात कमी मतदान झाल
करवीर मतदारसंघानंतर चिमूरमध्ये 81.75 टक्के, कागलमध्ये 81.72%, ब्रह्मपुरीमध्ये 80.54%, सिल्लोडमध्ये 80%, नेवासामध्ये 79% , शाहूवाडीमध्ये 79%, पलूस कडेगाव मध्ये 79%, नवापूरमध्ये 78%, शिराळामध्ये 78%, राधानगरीमध्ये 78%, सांगलीमध्ये 77% टक्के इतके मतदान झाले आहे.
त्यानंतर राज्यातील या मतदारसंघात कमी मतदान झालेले आहे. त्यामध्ये कुलाबा मतदारसंघात 44.49 % , अंबरनाथमध्ये 47.75 %, भिवंडी पूर्वमध्ये 49 % , धारावीमध्ये 49.70% चांदवलीमध्ये 50%, हडपसरमध्ये 50.11%, वांद्रे पश्चिममध्ये 50%, शिवाजीनगरमध्ये 50% तर पिंपरीमध्ये 51%, सायन कोळीवाड्यामध्ये 51.43% मतदान झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.