Ashish Shelar, Raj Thackeray And Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Ashish Shelar news : भाजप आक्रमक! मविआ-मनसेच्या मोर्चानंतर सत्य-असत्याची लढाई; मंत्री शेलार करणार विरोधकांचे वस्त्रहरण

MVA MNS rally News : गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या असतानाच महाविकास आघाडी व मनसेच्या नेत्यांनी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेल्या मोर्चानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मतचोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी व विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या असतानाच महाविकास आघाडी व मनसेच्या नेत्यांनी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेल्या मोर्चानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर आता त्यांच्या विरोधात सोमवारी (3 नोव्हेंबर) भाजपची (BJP) मोठी पत्रकार परिषद होणार आहे. भाजपकडून सोमवारी महाविकास आघाडीचा मोठा भांडाफोड करणार असल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मत चोरीच्या आरोपांबाबत भाजपचे मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट करणार आहेत.

मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजप नेते आशिष शेलारांची (Ashish Shelar) पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मविआच्या आरोपांचा भांडाफोड करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपने दिला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर शेलार नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे.

मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी देखील मतचोरीच्या विरोधात मोर्चा काढला होता.

या मोर्चात बोलताना राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मतचोरीच्या मुद्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. राज्यातील मतदार याद्यातील घोळ जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी त्यांनी लावूं धरली आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे याबाबत येत्या काळात आता निवडणूक आयोग यावर नेमकी काय भूमिका घेणार हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT