

रायगडमधील महाडमध्ये मनसे शहरप्रमुख पंकज उमासरे यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानात शिरून मारहाण केली.
या प्रकरणी माजी सभापती यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे रायगडमध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
Mahad News : रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आगामी स्थानिकच्या आधीच मनसेच्या एका पदाधिकाऱ्यावर जीव घेणा हल्ला झाला. तर हा हल्ला राजकीय धुसफुसीतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा होती. यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून ज्यात एका महिला नेत्यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हा हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे यांच्यावर करण्यात आला होता.
मनसे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात टीका केली होती. तसेच आगामी स्थानिकमध्ये गद्दार शिवसेनेचं काय होतं ते बघा असा इशारा दिला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून शिवसैनिकांनी पंकज उमासरे यांना महाड शहरातील चवदार तळे येथील दुकानात शिरून त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली होती.
या हल्ल्यानंतर पंकज उमासरे यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तसेच याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच तपासाला सुरूवात केली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी तपास करून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ज्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह रोहन धेडवाल, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, सौजन्य कानेकर ,भावड्या सुर्वे, निरज खेडेकर, सुनंदा पवार यांचा समावेश आहे. तर अधिकचा तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे तपास करीत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर या सर्वांनी आपलीय राजकीय भूमीका मांडत कोणी भाजप तर कोणी शिवसेना आणि कोणी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर आगामी स्थानिकबाबत बोलताना गोगावले यांनी खेडेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणात मनसेचे अस्तित्व संपले आहे. आता त्यांच्याकडे म्हणावी तशी ताकद उरली नाही, असे वक्तव्य केले होते. ज्यानंतर कोकणात मनसेकडून तीव्र अक्षेप घेण्यात आला. यानंतरच महाड शहरप्रमुख उमासरे यांनी देखील पलटवार केला. त्यांनी महाड नगर पालिकेत तुमचे दोन नगरसेवक का पडले असा सवाल केला होता.
कणातील माणसाने ठरवले तर तुमच्या गदार गटाचा नायनाट होईल असेही ठणकावले होते. तसेच येत्या निवडणुकीत मनसेची ताकद काय आहे हे देखील दाखवून देवू असे म्हटले होते. याचाच राग मनात धरून शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह 7 जणांनी त्यांना मारहाण केलीय. सध्या उमासरे यांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून या हाणामारीनंतर एकच खळबळ आता उडाली आहे. तर हा गुन्हा दाखल झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या अडचणी आगामी स्थानिकच्या आधी वाढल्याची येथे चर्चा सुरू झाली आहे.
1. हल्ला कुठे झाला?
हा हल्ला रायगड जिल्ह्यातील महाड शहरात झाला.
2. हल्ल्यात कोणावर निशाणा साधला गेला?
मनसे शहरप्रमुख पंकज उमासरे यांच्यावर हल्ला करण्यात आला.
3. गुन्हा कोणाविरुद्ध दाखल झाला आहे?
माजी सभापती सपना मालुसरे आणि सहा इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.
4. या घटनेमागचं कारण काय आहे?
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद वाढल्यामुळे हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.
5. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
महाड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.