INDIA Leaders Sarkarnama
मुंबई

INDIA Mumbai Meet : 'इंडिया'च्या बैठकीत पाच समित्यांची स्थापना ; कुठल्या समितीत कुणाची वर्णी लागली ?

INDIA Vs NDA : आपचे राघव चड्ढा एकापेक्षा जास्त समितीत, तर टीएमसीच्या अनेक समितील नावे अद्याप ठरली नाहीत

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : आगामी लोकसभेत मोदींना रोखण्यासाठी भाजपविरोधकांनी इंडिया आघाडीच्या छत्राखाली मुंबईतील बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी संयोजक आणि लोगोचे आनावरण झाले नसले तरी एकत्र आलेल्या पक्षांना बांधून ठेवण्यासाठी महत्वाच्या समन्वय समितीची गठीत करण्यात आली. यासह समन्वय आणि निवडणूक धोरण समिती, मोहीम समिती,सोशल मीडिया गट, प्रसारमाध्यम गट, संशोधनासाठी कार्यरत गटाची स्थापना करण्यात आली आहे. यात इंडियातील सहभागी २८ पक्षांतील नेत्यांना योग्य स्थान देण्यात आले आहे. (Latest Political News)

इंडिया समन्वय समिती आणि निवडणूक धोरण समिती

के. सी. वेणुगोपाल (काँग्रेस), शरद पवार (राष्ट्रवादी), टी. आर. बाळू (द्रमुक), हेमंत सोरेन (JMM), संजय राऊत (शिवसेना-ठाकरे गट), तेजस्वी यादव (राजद), अभिषेक बॅनर्जी (टीएमसी), राघव चड्ढा (आप), जावेद अली खान (एसपी), लल्लन सिंग (जदयू), डी. राजा (भाकप), ओमर अब्दुल्ला (एनसी), मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), सीपीएमच्या एका नेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

मोहीम समिती

गुरदीप सिंग सप्पल (आयएनसी), संजय झा (जदयू), अनिल देसाई (शिवसेना-ठाकरे), संजय यादव (राजद), पी.सी. चाको (राष्ट्रवादी), चंपाई सोरेन (JMM), किरणमय नंदा (एसपी), संजय सिंह (आप), अरुण कुमार (सीपीआय-एम), बिनॉय विश्वम (भाकप), निवृत्त न्यायमूर्ती हसनैन मसूदी (एनसी), शाहिद सिद्दीकी (आरएलडी), एन.के. प्रेमचंद्रन (आरएसपी), जी. देवराजन (एआयएफबी), रवी राय (CPI-ML), थिरुमावलन (व्हीसीके), के.एम. कादर मोईदीन (आययूएमएल), जोस के. (मणी केसी-एम), टीएमसीच्या एका नेत्याचा समावेश करण्यात येणार आहे.

सोशल मीडियासाठी कार्यरत गट

सुप्रिया श्रीनाते (काँग्रेस), सुमित शर्मा (राजद), आशिष यादव (एसपी), राजीव निगम (एसपी), राघव चड्ढा (आप), अविंदानी (JMM), इल्तिजा मेहबूबा (पीडीपी), प्रांजल (सीपीएम), डॉ. भालचंद्रन कानगो (भाकप), इफ्रा जा (एनसी), व्ही. अरुण कुमार (सीपीआय-एमएल), टीएमसीच्या एका नेत्याचा समावेश करण्यात येणार आहे.

प्रसारमाध्यमांसाठी कार्यरत गट

जयराम रमेश (काँग्रेस), मनोज झा (राजद), अरविंद सावंत (शिवसेना-ठाकरे), जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी), राघव चड्ढा (आप), राजीव रंजन (जदयू), प्रांजल (सीपीएम), आशिष यादव (एसपी), सुप्रियो भट्टाचार्य (जेएमएम), आलोक कुमार (जेएमएम), मनीष कुमार (जदयू), राजीव निगम (एसपी), भालचंद्रन कानगो (सीपीआय), तन्वीर सादिक (एनसी), प्रशांत कन्नोजिया, नरेन चॅटर्जी (एआयएफबी), सुचेता डे (सीपीआय-एमएल), मोहित भान (पीडीपी), टीएमसीच्या एका नेत्याचा समावेश करण्यात येणार आहे.

संशोधनासाठी कार्यरत गट

अमिताभ दुबे (काँग्रेस), सुबोध मेहता (राजद), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना-ठाकरे), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी), के.सी. त्यागी (जदयू) सुदिव्य कुमार सोनू (जेएमएम), जस्मिन शाह (आप), आलोक रंजन (एसपी), इम्रान नबी दार (एनसी), अॅड. आदित्य (पीडीपी), टीएमसीच्या एका नेत्याचा समावेश करण्यात येणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT