Mumbai News : कुणाला तरी उपोषणाला बसवायचे, ती व्यक्ती मरणाला टेकली तरी त्याला घेरायचे, हा प्रकार दुर्दैवी आहे. सरकार कुणालाही मरू देणार नाही. त्यासाठी पोलीस त्यांना उपचारासाठी घेऊन जाताना आंदोलकांनी दगडफेक झाली. याला उत्तर दिले नसते तर पोलिसांची आवस्था वाईट झाली असती. ही घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. यापूर्वी कुणीही मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. (Latest Political News)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जालनातील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. याबाबत उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झालेली होती. मराठा आरक्षासंदर्भात राज्य सरकार काम करत असल्याने त्यांनी उपोषण माघारी घ्यावे, असे आवाहन केले होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असल्याने हा एका दिवसात सुटणार प्रश्न नाही. हा मुद्दा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध स्तरावर गांभीर्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता."
सरकार कुणालाही मरू देणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी पोलिसांचे समर्थनही केले. "आदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गुरुवारी प्रयत्न केला. मात्र आज नाही उद्या दाखल करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानुसार पोलीस आज आंदोलनस्थळी दाखल झाले होते. उपोषणकर्त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती फडणवीसांनी दिली. दगडफेकीला उत्तर दिले नसते तर पोलिसांची अवस्था वाईट झाली असती, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
"घटनास्थळी पोलिसांना घेरून दगडफेक करण्यात आली. यात महिलांसह १२ पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर लाठीचार्जचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलिसांनी कुणी गंभीर होऊ नये याची काळजी घेतली. दरम्यान, लाठीचार्ज कमी आणि अश्रुधुराच्या नळकांड्याच जास्त फोडण्यात आल्या. त्या फोडल्या नसत्या तर पथकावर बेछूट होत असलेल्या दगडफेकीमुळे पोलिसांवर वाईट वेळ आली असती", असे फडणवीस म्हणाले.
कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन करताना फडणवीसांनी विरोधकांचे कान टोचले. ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहेत. तसेच एखाद्या व्यक्तीला उपोषणा बसवून सर्वांनी त्याला घेरून ठेवायचे, आणि मरणावर सोडून द्यायचे हे बरोबर नाही. सरकार कुणालाही मरू देणार नाही. यातून पोलिसांनी ही भूमिका घेतलेली आहे. दरम्यान, झालेल्या घटनेची चौकशी केली जाणार आहे. कुणाचीही चूक असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सर्वांनी शांतता पाळावी. राजकीय पक्षांना आणि नेत्यांना विनंती करतो की वाहत्या गंगेत हात धूवून घेऊ नये."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.