Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Wine किराणा दुकानांत : `ठाकरे सरकार, दारूड्यांसाठी काम करतयं!`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्य सरकारने वाईन (Wine) दुकानांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात आता भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपचे आघाडीचे नेते देेवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तातडीने या निर्णयाच्या विरोधात बाजू मांडली. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. त्यावरही या नेत्यांनी टीका केली आहे.

दरेकर म्हणाले की सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे.हे सरकार दारुड्याची काळजी घेत आहे. उद्याची पिढी बरबाद कशी होईल याची पर्वा या सरकारला दिसत नाही. बेवड्यांना समर्पित असा निर्णय घेतला आहे. ना मंदिराची काळजी. ना शिक्षणाची काळजी. कुटुंब उध्वस्त करणार्यांना दारुद्याना हे सरकार प्रोत्साहन देत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, असा टोला लगावला आहे. दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी ‼️ महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय❗️आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू ‼️ महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच❗️ महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे?सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारचे मद्यप्रेम यापूर्वी वारंवार दिसून आले होतेच.आता किराणा मालाच्या दुकानात दारु विकण्याची परवानगी दिली आहे. पब, पेग, पार्टी आणि दारु याबाबत "अती संवेदनशील" असणाऱ्या ठाकरे सरकारने भविष्यात नळा व्दारे 24×7 घरोघरी दारु उपलब्ध करुन दिली तरी नवल वाटू नये, असा टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT