BJP Sarkarnama
मुंबई

BJP Politics : "मी लायक नसेन..." मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सलग 3 वेळा विजयी झालेल्या भाजप आमदाराने व्यक्त केली खदखद

MLA Sanjay Kelkar : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्याना मंत्रि‍पदाची संधी देण्यात आलेली नाही. यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 24 Dec : महायुती सरकारमधील नेत्यांचे शपथविधी पार पडल्यानंतर या त्यांचं खातेवाटप देखील जाहीर झालं आहे. मात्र, यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतडून अनेक दिग्गज नेत्याना मंत्रि‍पदाची संधी देण्यात आलेली नाही.

यामध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवर तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अनेक नेत्यांनी आपल्या पक्ष श्रेष्ठींवर नाराजी दर्शवली आहे. अशातच आता भाजपचे ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी देखील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने खंत व्यक्त केली आहे.

शिवाय पक्षाला मी लायक वाटलो नसेल त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसेल असं वक्तव्य केळकर (MLA Sanjay Kelkar) यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील खदखद बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाचं म्हणजे संजय केळकर हे सलग तीन वेळा ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे या टर्ममध्ये त्याचं मंत्रिपद फिक्स असल्याची चर्चा होती.

मात्र, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडली नाही. त्यामुळे केळकर सध्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आमदार केळकर म्हणाले, "शेवटी पक्ष आणि पक्षाचे केंद्रीय आणि राज्यातील वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेत असतात.

त्यांना कदाचित मी लायक वाटलो नसेन त्यामुळे मला मंत्रिमंडळात घेतलं नसेल. मी पक्षाच्या स्थापनेपासून काम करत आहे. त्यावेळी कधीही आमदार, मंत्री व्हायचा असा आमचा विचार नव्हता. शिवाय जेव्हा पक्षाला मी लायक वाटेल तेव्हा पक्ष मला जबाबदारी देईल."

महायुतीचं धक्कातंत्र

दरम्यान, महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात यंदा अनेक दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामध्ये भाजपचे (BJP) माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना मंत्रि‍पदापासून वंचित ठेवण्यात आलं आहे.

तर अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा पत्ताही मंत्रिमंडळातून कट केला आहे. अशातच आता नाराज भुजबळ यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल करत बंड करण्याचे संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT