Mumbai Zoo Penguin Marathi Names Controversy Sarkarnama
मुंबई

Mumbai Zoo Penguin Controversy : पेंग्विन पिल्लांच्या नावांवरून राजकारण तापलं; भाजप म्हणतं, इंग्रजीत नावं का?

BJP Protests in Mumbai Demanding Marathi Names for Ranibagh Penguin Chicks: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील नवीन पेंग्विनच्या पिल्लांना दिलेल्या इंग्रजी नावावरून भाजपनं राजकारण सुरू केलं आहे.

Pradeep Pendhare

Marathi Names For Byculla Zoo Penguins: मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात म्हणजेच, राणीबागेत जन्मलेल्या पेंग्विन पिल्लांना नावं देण्यावरून राजकारण तापलं आहे. या पिल्लांना मराठीच नावं देण्यासाठी भाजपनं आंदोलनाचं हत्यार उपसलं.

राणीबागेसमोर भाजपने केलेल्या आंदोलनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने चिमटा काढत डिवचलं आहे. भाजप नाकर्तेपणा झाकण्यासाठी आंदोलनाचे उद्योग करत असल्याचा टोला शिवसेना ठाकरे सेनेने लगावला आहे.

मुंबईतील (Mumbai) वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात म्हणजेच राणीबागेतील नवीन पेंग्विनची नावे ‘नॉडी’, ‘टॉम’ आणि ‘पिंगू’ अशी आहेत. या तिन्ही पेंग्विन पिल्लांची नावे इंग्रजीमध्ये आहेत. भाजपने या पिल्लांना मराठी नावे देण्याची मागणी केली आहे.

जन्माला आलेल्या पेंग्विन पिल्लांची नावे इंग्रजी भाषेत दिल्यावरून भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपचे (BJP) नितीन बनकर यांनी बाग प्रशासनला 30 एप्रिलला पत्र देत, पेंग्विनच्या पिलांची इंग्रजी नावे काढून मराठी भाषेत त्यांचे नामकरण करावे, अशी मागणी केली.

मराठी भाषेत नावे देण्यासाठी भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देखील भाजपने दिला होता. या इशाऱ्यानंतर लगेचच भाजपने सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनावर शिवसेना ठाकरेंच्या पक्षाने भाजपला सुनावलं आहे. भाजपने आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी छोट्या-छोट्या मुद्यांवरून राजकारण करायला सुरूवात केल्याचा टोला शिवसेना ठाकरे सेनेने लगावला आहे.

दरम्यान, भाजपने पेंग्विन पिलांच्या नावासंदर्भात शुक्रवारी राणीबाग प्रशासनास पत्र दिले. तोपर्यंत कार्यालय बंद झाले होते. यानंतर दोन दिवस सुटी होती. यामुळे या मागण्यांवर काहीही निर्णय घेता आला नाही. भाजपने यानंतर लगेचच आंदोलन केले. राजकीय पक्षाना आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे. पण निर्णय घ्यायला वेळ द्यायला हवा, असे राणीबागेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT