Political Live Updates: मुंबई उच्च न्यायालयाचा बकरी ईदनिमित्त विशाळगडाबाबत मोठा निर्णय

Sarkarnama Headlines : महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या, राजकीय बातम्या, वाचा एका क्लिकवर
Mumbai High Court
Mumbai High CourtSarkarnama
Published on
Updated on

मुंबई उच्च न्यायालयाचा बकरी ईदनिमित्त विशाळगडाबाबत मोठा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयानं विशाळगडाबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. यंदाच्या बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. येत्या 7 आणि 8 जूनला नियम,अटींचे पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्वच भक्तांना विशाळगडावर कुर्बानी देता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात नियुक्तीसाठी बोगस सरकारी पत्र

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात एक युवक नर्स म्हणून नियुक्तीसाठी सरकारी पत्रासह दाखल झाला. पण रुग्णालयातील नियुक्त्या संपल्या असतानाही सरकारकडून हे पत्र कसं देण्यात आला, असा प्रश्न घाटी रुग्णालय प्रशासनाला पडला. या पत्राची पडताळणी सुरू झाल्यानंतर युवकाला संशय आला आणि त्यानं त्याच्या 3 साथीदारांसह तिथून पळ काढला.

संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानांचे वेळापत्रक जाहीर 

आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाचे वेळापत्रक समोर आले आहे. माऊलींच्या पालखीचे आळंदीतून 19 जून तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 18  जून रोजी प्रस्थान करणार आहे.

दिवसभर रेकी अन् रात्री महिलांची कपडे घालून चोरी करणाऱ्याला पोलिसांनी अटक

दिवसभर रेकी करुन रात्री महिलेची कपडे घालून चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या हुशार चोराने मुंबईतील मालाड, कांदिवली, बोरिवली भागांमध्ये चोऱ्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहेत. 

सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात घुसून तोडफोड

सांगलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात घुसून तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. यात रुग्णालयाच्या काचा फोडण्यात आल्या. शिवाय रुग्णालयाचं मोठं नुकसान ही करण्यात आलं आहे. तोडफोडीनंतर वंचितकडून रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.  

विशेष बैठकीनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, 'महिला आयोगाला ताकद देण्याची गरज...' 

महिला आयोगाबाबतच्या विशेष बैठकीनंतर भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला ताकद देण्याची गरज असून काही लुप होल आहेत, त्यावर काम करावं लागणार असल्याचं म्हटलं.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. 

रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत का? सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी(ता.जून) मुंबईत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.  यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला, त्या काय रश्मिका मंदाना आहेत का?, अशी खोचक टिप्पणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com