Dombivli News: कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा एकदा महायुतीकडून संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला शिवसेनेला मदत केली नसल्याचा राग भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे.
भाजपचे वरुण पाटील यांनी बंडखोरी केली होती. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पाटलांची समजूत काढण्याची माहिती आहे. त्यामुळे पाटील यांनी आता विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिला आहे. सोमवारी रात्री पत्रकार परिषद घेत वरुण यांनी भोईर यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
हा मतदारसंघ भाजपाकडे यावा, यासाठी भाजपकडून जोर लावला जात होता. मात्र युतीत ही जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) गेली. यामुळे नाराज भाजप मधील नरेंद्र पवार, वरुण पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातही नरेंद्र पवार यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र वरुण यांनी अर्ज मागे घेतला नव्हता. वरुण यांची यामुळे भाजपा मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बंडखोर वरुण पाटील मतदानाच्या आठवड्याभरा आधीच निवडणूक रिंगणातून यु टर्न घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरून आदेश येताच पाटलांनी भूमिका बदलली आहे. भोईर यांना येथून पाठिंबा दिला असला तरी याचा मतांवर किती परिणाम होतो हे निकालानंतरच समजेल.
भाजपाने शिवसेनेचे उमेदवार भोईर यांना पाठिंबा दिला असला तरी आता भाजपची मते भोईरांना मिळणार का? विरोधक याचा कसा फायदा उचलतात व भोईर कसे रणनिती आखतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
कल्याण पश्चिम येथून वरुण पाटील हे सक्षम उमेदवार असले तरी ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला दिली आहे. वरुण हे संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी युतीधर्म पाळला पाहिजे, असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरुण यांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले. तेथे त्यांची चर्चा झाली. यानंतर वरुण यांनी लागोलाग यु टर्न घेत आपली भूमिका बदलत भोईर यांना आपला पाठिंबा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.