BJP Thane Mission  Sarkarnama
मुंबई

Thane Politics : ठाण्यात भाजपचा तरुणांवर डाव; शिंदेंच्या 'युवासेनेला' देणार तगडी फाईट

Thane Politics : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेसमोर मित्र पक्ष भाजपच रोज नवे आव्हान उभे करत आहे.

Hrishikesh Nalagune

Thane : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेसमोर मित्र पक्ष भाजपच रोज नवे आव्हान उभे करत आहे. आधी शत प्रतिशत भाजपचा नारा देत पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयार केले. त्यापाठोपाठ अनेक पक्षप्रवेश पार पडले. महापालिकेत जनता दरबार घेण्यासाठी पावलं टाकली आहेत. आता शिवसेनेसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी भाजपने आणखी एक डाव खेळला आहे.

भाजपने शहरातील 18 मंडळ अध्यक्षपदी आक्रमक तरुणांना संधी देत फळी उभारली आहे. त्यांच्यावर स्थानिक संघटना बळकट करण्याची जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेच्या युवासेनेला टक्कर देण्यासाठी तरुणांची ही फौज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आल्याचे बोलले जाते. निवड करण्यात आलेले सर्व मंडल अध्यक्ष हे 35 ते 45 या वयोगटातील आहेत. त्यामुळे आमदार संजय केळकर, आमदार आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या अनुभवी नेत्यांच्या जोडीला आता तरुण मंडळ अध्यक्ष असणार आहेत.

या नियुक्त्यांबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष संजय वाघुले म्हणाले, यापूर्वी भाजपची ठाणे महापालिका क्षेत्रात 12 मंडळ अस्तित्वात होती. त्यांची पुनर्रचना करून 18 मंडळ तयार करण्यात आली आहेत. आगामी ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही निवड केली आहे. पालिका काबिज करायची असेल, तर अनुभवी नेत्यांसोबत आक्रमक तरुणांची फौज असणे आवश्यक आहे. आता शहरातील सर्व भागात संघटनात्मक जाळे मजबूत करून प्रत्येक बूथवर 51 टक्के मते मिळविण्याचा निर्धार केला आहे.

नवनियुक्त मंडल अधिकारी :

भाजपच्या वडवली मंडल अध्यक्षपदी ज्योती ठाकूर, वसंत विहार - शिवाईनगर अध्यक्षपदी राकेश चौघुले, वर्तकनगर माजिवडा अध्यक्षपदी वैभव कदम, लोकमान्य नगर अध्यक्षपदी नीलेश पाटील, ज्ञानेश्वर नगर-वैतीवाडी अध्यक्षपदी भूषण पाटील, इंदिरा नगर अध्यक्षपदी गुलाब झा, वागळे इस्टेट अध्यक्षपदी नीलेश लोहोटे, कोपरी अध्यक्षपदी कृष्णा भुजबळ, ब्रह्मांड बाळकूम अध्यक्षपदी नीलेश पाटील, मानपाडा अध्यक्षपदी जितू मढवी, राबोडी अध्यक्षपदी विनया भोईर, वृंदावन पाचपाखाडी अध्यक्षपदी प्रमोद घोलप, नौपाडा अध्यक्षपदी रोहित गोसावी, कळवा पश्चिम अध्यक्षपदी तेजस चंद्रमोरे, कळवा पूर्व अध्यक्षपदी कृष्णा यादव, मुंबा अध्यक्षपदी सुजित गुप्ता, कौसा अध्यक्षपदी नाझिया तांबोळी, दिवा अध्यक्षपदी सचिन भोईर यांची निवड करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT