BJP Politics : भाजप काँग्रेसचा कित्ता गिरवून नागपुरात भाकरी फिरवणार? अध्यक्षपदासाठी महिला नेत्याचे नाव आघाडीवर

Sandhya Gotmare, BJP Leader in Nagpur Rural : भाजपने अध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. नागपूर ग्रामीणसाठी माजी खासदार सुनील मेंढे हे निरीक्षक आहेत.
BJP Nagpur
BJP NagpurSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गोतमारे आता भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. नागपूर ग्रामीणमधून तीन जणांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. यात माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निदान, आनंदराव राऊत यांचा समावेश आहे. यात संध्या गोतमारे यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपच्या 20 टक्के महिलांना प्राधान्य देण्याच्या निकषात त्या फिट बसतात.

भाजपने अध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. नागपूर ग्रामीणसाठी माजी खासदार सुनील मेंढे हे निरीक्षक आहेत. दोन दिवसांपूर्वी ते नागपूरला येऊन गेले. विविध पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कोणाला अध्यक्ष करायचे याविषयी मत जाणून घेतले. अनिल निदान हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जवळचे मानले जातात.

BJP Nagpur
Pahalgam Terror Attack : पहलगामनंतर पुन्हा हल्ल्याची भीती; अखेर जम्मू-काश्मीर सरकारने घेतला मोठा निर्णय

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र अनिल निदान पराभूत झाले होते. विशेष म्हणजे त्यांना शेवटपर्यंत भाजपने उमेदवारी जाहीर केली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या निदान यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. निवडणुकीची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. निवडणुकीत त्यांच्याकडे कमळ चिन्ह नसल्याने ते पराभूत झाले.

कामठी विधानसभा मतदारसंघावर दावा करणाऱ्या निदान यांना भाजपच्या एका बड्या नेत्याने त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे बोलले जाते. निवडणुकीनंतर झाले गेले विसरून निदान पुन्हा भाजपात सक्रिय झाले आहेत. मात्र त्यांनी सर्व मदार बावनकुळे यांच्या संमतीवर आहे. आनंदराव राऊत अनेक वर्षांपासून राजकीय प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यांचा उमरेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे त्यांनी आपले सर्व लक्ष शेती आणि ॲग्रोव्हिजनवर केंद्रीय केले आहे.

BJP Nagpur
Canada Election : भारताच्या शत्रूचा कॅनडात दारूण पराभव; जगमीत सिंहच्या पक्षाचा सुपडा साफ

भाजपने अध्यक्षपदासाठी निश्चित केलेल्या वयाच्या निकषात ते बसत नाहीत. संध्या गोतमारे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत हिंगणा विधानसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केला होता. मात्र आमदार समीर मेघे दोन टर्म निवडून आले असल्याने भाजपचे दुसऱ्या नावाच्या पर्यायाचा विचार केला नाही.

भाजपने 20 टक्के महिलांना अध्यक्षपद देण्याचे ठरवले आहे. हे बघता संध्या गोतमारे यांची दावेदारी प्रबळ मानली जाते. ग्रामीणमधून भाजपचे यापूर्वी एकाही महिलेला अध्यक्ष केले नाही. या उलट काँग्रेसने सुनिता गावंडे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करून त्यांना दोन वेळा विधानसभेचे तिकीटही दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com