Navi Mumbai Politics : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून भाजप आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. वनमंत्री गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर परस्पर टीकाटिप्पणी सुरू असल्याने हा वाद आता कार्यकर्त्यांच्या पातळीवर पोहोचला आहे.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईक यांच्यावर सातत्याने टीका केली जात असताना, भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला ही वादावादी केवळ वक्तव्यांपुरती मर्यादित होती; मात्र आता ती थेट बॅनरबाजी आणि आंदोलनांपर्यंत पोहोचली आहे.
शिंदे गटाचे नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी शहरातील विविध ठिकाणी आक्षेपार्ह मजकूर असलेले फलक लावल्याने वातावरण अधिकच चिघळले. स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकारांचा मोफत उपचार करून मिळेल, असा मजकूर असलेल्या या बॅनरमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त असून अंकुश कदम यांच्याविरोधात रॅली काढली.
या रॅलीदरम्यान त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या घटनेमुळे शहरात राजकीय तणाव अधिकच वाढला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काळात या वादावर वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि प्रशासन परिस्थिती कशी हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.