Naik vs Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक पुन्हा भिडणार, परिवहन समिती निवडणुकीत आमने-सामने

Navi Mumbai Transport Committee Election : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समितीवर शिवसेना–भाजप आमने-सामने आले असून निवडणूक अटळ असून स्वीकृत सदस्य निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
Ganesh Naik vs Eknath Shinde
Ganesh Naik vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai Politics : नवी मुंबई महापालिकेमध्ये महापौर व उपमहापौर निवडीनंतर आता परिवहन समिती व स्वीकृत सदस्य पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. परिवहन समितीच्या १२ जागांसाठी आणि १० स्वीकृत सदस्य पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले.

परिवहन समितीच्या सर्व १२ जागांसाठी भारतीय जनता पक्षाने प्रत्येकी १२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे परिवहन समितीची निवडणूक अटळ ठरली असून, भाजपने ही खेळी शिवसेना (शिंदे गट) विरोधात रणनीती म्हणून केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेदांचा प्रत्यय या निवडणूक प्रक्रियेतून आल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत तसेच माजी खासदार संजीव नाईक व गटनेते सागर नाईक यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर शिवसेनेकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर झाले.

सध्याच्या पालिकेतील संख्याबळ पाहता भाजपचे ६५ नगरसेवक असून एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबाही भाजपला आहे. त्यामुळे भाजपचे पारडे जड मानले जात आहे. ‘प्रती नगरसेवक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वीकृत सदस्य पदांसाठी भाजपने सहा तर शिवसेनेने चार उमेदवार दिले आहेत. त्यामुळे स्वीकृत सदस्यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, परिवहन समितीच्या सदस्य पदासाठी शिवसेना व भाजप परस्परविरोधी उमेदवार दिल्याने थेट लढत होणार आहे. येत्या शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी सभागृहात हात उंचावून मतदानाद्वारे परिवहन समितीचे सदस्य निवडले जाणार आहेत.

गुरुवारी, १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपने अर्ज मागे न घेतल्यास, निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी ४८ तासांत राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच परिवहन समितीच्या निवडणुकीला इतके महत्त्व प्राप्त झाले आहे.

Ganesh Naik vs Eknath Shinde
NCERT Map Controversy : राजपूतांच्या दबावामुळे मराठ्यांच्या इतिहासाशी छेडछाड; आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा 'तो' नकाशा हटवला

परिवहन समिती व स्वीकृत सदस्य उमेदवारांची यादी

परिवहन समिती – भाजप उमेदवार

विकास झंजाड

ॲड. यशपाल ओव्हाळ

अभिजीत पेडणेकर

विनोद तुळशीराम म्हात्रे

राहुल शिंदे

राजेश्री कातकरी

रोशन पाटील

हनुमंत कोंडीबा रोडे

कुणाल महाडिक

तीर्था मारुती सकपाळ

राजेश हौसला राय

मारुती जानू सकपाळ

परिवहन समिती – शिवसेना उमेदवार

संतोष महादेव दळवी

जब्बार पटेल

संजय वर्धमाने

गौतम बलवंते

अजित रघुनाथ सावंत

स्वीकृत सदस्य उमेदवार

शिवसेना

साहिल देविदास चौगुले

अंकुश बाबा कदम

सुरेश भिलारे

द्वारकानाथ भोईर

भारतीय जनता पार्टी

बंडू केनी

अमित मेढेकर

ॲड. अपर्णा गवते

कुलदीप सुरी

लक्ष्मीकांत पाटील

भरत नखाते

Ganesh Naik vs Eknath Shinde
PMC News : भाजपची सत्ता असूनही पहिला धक्का मंत्री माधुरी मिसाळ यांना; निधीचा प्रस्ताव बासनात, नगरसेवकही चिडीचूप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com