Rohit Pawar Vs Ajit Pawar : Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार गटाकडून आमदारांचं ब्लॅकमेलिंग; रोहित पवारांचे खळबळ उडवून देणारे आरोप !

NCP Crisis News : "सही कर नाहीतर, आमदारांचं ब्लॅकमेलिंग..."

Chetan Zadpe

Mumbai News : शरद पवार गटाचे एक खासदार आणि एक आमदार हे अजित पवार गटात जाण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांच्याकडून अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे. सही कर नाहीतर तुझ्यासंदर्भात कारवाई केली जाईल. सही नाही केलीस तर कारवाईचा बडगा उचलला जाईल, असं सांगितलं जात असावं, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार म्हणाले, "एखादं महत्त्वाचं काम तोपर्यंत आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, जोपर्यंत तुम्ही सही करत नाही, असेही प्रकार घडत आहेत, असं आम्हाला कळतंय. अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंगचे प्रकार केले जात आहेत, असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला आहे.

"शेवटी आमदाराला काय पाहिजे असतं? आमदाराच्या मतदारसंघातील कामं पूर्ण व्हावीत, प्रश्न सुटावेत, यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. तू सही कर नाहीतर हे काम होणार नाही, असे बोलल्याचे काही नेते आम्हाला सांगतात, असे प्रकार होत असल्याचे कळतंय. असे ब्लॅकमेलिंगचे प्रकार करून कदाचित आज आमदारांचा आकडा तुमच्या बाजूने दिसेल. पण जेव्हा निवडणुका होतील तेव्हा कळेल की, किती लोकं तुमच्याबरोबर आहेत," असे रोहित पवार म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT