BJP leaders during preparations for the Mumbai Municipal Corporation elections amid discussions on ticket distribution strategy. sarkarnama
मुंबई

BJP Politics : ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी मुंबईत भाजपची मोठी खेळी, तब्बल येवढ्या जागांवर उत्तर भारतीयांना तिकीट

BJP Non Marathi Candidate BMC Election : मराठी विरुद्ध अमराठी वाद मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रंगणार असल्याचे चिन्ह आहे. भाजपने उत्तर भारतीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

Roshan More

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी हा वाद निर्माण झालेला आहे. त्यातच मिरा भाईंदरमध्ये भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी येवढे नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल, असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध उत्तर भारतीय वाद आणखीच पेटला आहे.

दरम्यान, मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युती विरोधात मुंबईत भाजपने उत्तर भारतीय उमेदवारांना देखील महापालिकेची उमेदवारी दिली आहे.

भाजपने तब्बल 92 मराठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर, 45 इतर भाषिक उमेदवार आहेत. यामध्ये 15 उत्तर भारतीय उमेदवार आहेत.

गुजराती भाषिकांचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी गुजराती भाषिक उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहेत. 15 उत्तर भारतीय उमेदवार तर 30 इतर समाजातील उमेदवारांना भाजपने तिकीट दिले आहे. मीरा भाईंदरमध्ये देखील 14 उत्तर भारतीयांना उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे.

ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये भाजपने मराठी उमेदवारांना प्राधान्य दिलेले आहे. केवळ दोन उत्तर भारतीय उमेदवार आहेत. तर, उल्हासनगरमध्ये तब्बल 10 उत्तर भारतीय उमेदवार देण्यात आले आहेत.

44 उत्तर भारतीय उमेदवार

मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या सहा महापालिकांचा विचार केला असता भाजपने 44 उत्तर भारतीय तर अन्य भाषिक समाजातील तब्बल 106 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्या तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे उत्तर भारतीयांना उमेदवारी देण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे.

ठाकरे बंधूंची एकत्रित सभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा एकत्रित वचननामा 4 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर पाच जानेवारीपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित सभा सुरू होतील, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT