Nana Patole
Nana Patole Sarkarnama
मुंबई

BMC Election : मुंबई मनपा काँग्रेस स्वबळावर लढवणार; पटोलेंच्या विधानाने ठाकरे गटाला टेन्शन!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Municipal Corporation Congress will face on its own : काँग्रेस मुंबई महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारी सूत्रांकडून मिळते. लोकसभा आणि विधानसभा मात्र एकत्रित लढवणार असं सूत्रांकडून कळतंय. मुंबईत काँग्रेस दोन नंबरचा पक्ष असल्याची काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. कर्नाटकच्या मोठ्या विजयानंतर काँग्रेसचं आत्मविश्वास वाढला आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीचं तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. मात्र काँग्रेस स्वबळवर निवडणुका लढवण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. काँग्रेस नेत्यांच म्हणणं आहे की, आम्ही जो अंतर्गत सर्व्हे केला आहे, त्यानुसार शिवसेवा ठाकरे गट एक नंबरचा पक्ष आहे, तर काँग्रेस दोन नंबरचा पक्ष आहे. तीन नंबरला भाजप आणि शिंदे गट असल्याचा दावा मुंबई काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला आहे.

काँग्रेस जर महाविकास आघाडीत लढली तर कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे . तसेच , जागा वाटपावरही वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कुठेतरी काँग्रेस स्बबळावर लढण्याची शक्यता आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार का? असे विचारले असता नाना पटोले म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरची गणितं आणि स्थानिका नेत्यांच्या भावना लक्षात घेऊन लढवण्यात निर्णय आम्ही घेऊ. काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT