BMC Akshata Tendulkar Sarkarnama
मुंबई

BMC Election update : अक्षता तेंडूलकर यांचा मोठा गौप्यस्फोट; माजी आमदार भाजपचे गद्दार कार्यकर्ते हाताशी धरून पक्षाचा डेटा...

Akshata Tendulkar BJP leader allegation : मंडळ अध्यक्ष, प्रभारी किंवा जिल्ह्याला न सांगता थेट मीटिंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा आरोप अक्षता तेंडूलकर यांनी केला आहे.

Rajanand More

BMC election controversy : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौरपदाची चर्चा सुरू असतानाच महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या मुलासह मुलीचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. दोघांच्याही पराभवासाठी भाजपने प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबईतील प्रभाग १९१ मधून प्रिया सरवणकर आणि १९४ मधून समाधान सरवणकर यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी पराभव केला आहे. त्यानंतर आता समाधान सरवणकर यांनी माहीम विधानसभेत आपल्याला भाजपची मदत झाली नाही, असा आरोप केला आहे. भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सांगितलं की मदत करू नाही, असेही सरवणकर म्हणाले.

याबाबतचे व्हॉट्सअप चॅटिंगही सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यावरून भाजपच्या दक्षिण मध्य मुंबईच्या सरचिटणीस चांगल्याच संतापल्या आहेत. सरवणकर यांनी त्यांच्याकडेच बोट दाखविल्याची चर्चा आहे. त्यावरून तेंडूलकर यांनी स्पष्टीकरण देताना थेट सदा सरवणकरांवर गंभीर आरोप केले आहेत.

तेंडूलकर यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत म्हटले आहे की, प्रत्येक निवडणुकीमध्ये स्थानिक माजी आमदार प्रोटोकॉल न पाळता काही भाजपचे गद्दार कार्यकर्ते हाताशी धरून पक्षाचा डेटा घेतात आणि थेट कॉल करून त्यांना शिवसेना शाखेत नाही, तर त्यांच्या वैयक्तिक मीटिंगला बोलावतात. हाच प्रकार कॉर्पोरेशन निवडणुकीतही वार्ड १९१ मध्ये घडला.

मंडळ अध्यक्ष, प्रभारी किंवा जिल्ह्याला न सांगता थेट मीटिंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आमचे नेते व प्रभारी यांनी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आठवण करून दिली की आधी आपली समन्वय बैठक होईल, त्यानंतर ज्या वॉर्डमध्ये भाजपचा उमेदवार आहे, तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते मदत करतील आणि ज्या वॉर्डमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे, तिथे भाजपचे कार्यकर्ते मदत करतील, असे तेंडूलकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

ज्या दिवशी आम्हाला कळले की, शिवसेना वार्ड १९१ मध्ये प्रोटोकॉल न पाळता मीटिंग घेत आहे, त्या वेळी आम्ही त्याला विरोध केला आणि मी स्वतः सदा सरवणकर यांची भेट घेऊन समन्वय बैठक लावली. त्यानंतर वार्ड १९१, १९२ आणि १९४ मध्ये भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत काम करत होते. खरे म्हणजे फक्त भाजप पदाधिकारी काम करत होते. मात्र वार्ड १८२ मध्ये शिवसेना शाखा प्रमुख मिलिंद तांडेल उघडपणे महायुतीचे उमेदवार राजन पारकर यांच्या विरोधात काम करत होते. तसेच आशिष शेलार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करत होते, असा आरापो तेंडूलकर यांनी केला आहे.

आम्ही सरवणकर यांना विनंती केली की जे घडत आहे ते बरोबर नाही. भाजपचा उमेदवार पैशांमध्ये कमी असला तरी महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, गद्दार आपल्यातही आहेत. भाजपचा डेटा विकणे, पक्षविरोधी काम करणे आणि पक्षशिस्त न पाळणे हे प्रकार सुरू आहेत. खूप मेहनतीने संघटन आपण उभे करतो, पैशाच्या जोरावर संघटनेचे वाटोळे होऊ देणार नाही, असे सांगत तेंडूलकर यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडेही बोट दाखविले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT