Tamil Nadu assembly Election : तमिळनाडूत ‘विजय’ कुणाचा? मोदींच्या दौऱ्याआधी मोठी बातमी, NDA ची ताकद वाढली...

AMMK leader joins NDA : एनडीएतून बाहेर पडल्यानंतर दिनकरन यांच्या पक्षाकडून विजय यांच्या पक्षासोबत आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त होते.
Tamil Nadu assembly 2026
Tamil Nadu assembly 2026Sarkarnama
Published on
Updated on

NDA expansion South India : तमिळनाडूमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी डीएमकेसह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. डीएमके-काँग्रेस विरूध्द अण्णाद्रमुक-भाजप अशी थेट लढत होईल, असे मागील काही महिन्यांपर्यंतच चित्र होते. मात्र, प्रसिध्द अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षानेही कमी कालावधीत चांगलाच जम बसविला आहे.

विजय यांच्या पक्षाला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रामुख्याने विरोधकांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच एनडीएला तमिळनाडूत आणखी एक भिडू मिळाला आहे. त्यामुळे एनडीएची ताकद वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ तारखेला तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहे. यादिवशी ते एनडीएच्या प्रचाराचे रणशिंग फुंकतील. त्याआधी अम्मा मक्कल मुन्नेत्र कडगम (AMMK) पक्षाने एनडीएला पाठिंब्याची घोषणा केली आहे.

एएमएमकेचे महासचिव टी. टी. व्ही. दिनकरन यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. ही नवी सुरूवात असल्याचे सांगत दिनकरन यांनी एनडीएमध्ये पुन्हा सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वीच ते एनडीएतून बाहेर पडले होते. आज मीडियाशी बोलताना दिनकरन यांनी डीएमकेला पराभूत करून स्थिर सरकार देण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे सांगितले.

Tamil Nadu assembly 2026
Vinod Tawde News : एकही आमदार नाही, खासदारही एकच... सत्तेसाठी विनोद तावडेंचा गनिमीकावा कामी येणार?

राजकारणात तडजोड गरजेची असल्याचे सांगत यात काही चुकीचे नाही, असेही ते म्हणाले. आता दिनकरन हे मोदींच्या सभेमध्ये सहभागी होऊन आघाडीवर शिक्कामोर्तब करतील. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये दिनकरन एनडीएमध्येच होते. पण काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक अण्णाद्रमुकचे महासचिव पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे अमित शाह यांनी जाहीर केल्यानंतर ते बाहेर पडले होते.

Tamil Nadu assembly 2026
Pavitra Portal TET : शिक्षकांना नियुक्ती नाकारल्यास शिक्षण संस्थांना बसणार जोरदार दणका; सरकारने घेतला मोठा निर्णय

एनडीएतून बाहेर पडल्यानंतर दिनकरन यांच्या पक्षाकडून विजय यांच्या पक्षासोबत आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त होते. पण ही चर्चा आघाडीपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे दिनकरन यांना एनडीएशिवाय पर्याय उरला नव्हता, असेही बोलले जात आहे. विजय यांनी यापूर्वीच भाजपसोबत आघाडी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर काँग्रेससाठी त्यांनी आपले दरवाजे खुले ठेवले आहेत. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत होणार का, याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com