MNS prepares to contest independently and targets 125 seats Sarkarnama
मुंबई

BMC Elections 2025: ठाकरे बंधुंच्या युतीत मोठा ट्विस्ट, मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी? 125 जागांवर ठाम

Raj Thackeray decision to fight on 125 seats : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंची मुंबई महापालिकेसाठी युती होण्याची शक्यता असताना मनसेकडून 125 जागांवर लढण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. या जागांवर आपली ताकद असल्याचे मनसे पदाधिकारी सांगत आहेत.

Roshan More

MNS Election Strategy 2025: मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची युती होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी तर जाहीर सभांमधून आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, असे सांगितले आहे.

मात्र, मनसे स्वबळावर लढण्याची हालचाली करते आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी 125 जागांवर मनसेची ताकद असल्याचा दावा करण्यात येत आहे. या जागा लढण्यावर मनसे नेते ठाम आहेत.

मनसेच्या (MNS) नेत्यांकडून मागील काही दिवसांपासून प्रभागनिहाय आढाव घेण्यात येत होता. या आढाव्यामध्ये तब्बल 125 जागांवर मनसेची ताकद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या जागा आपण लढल्याच पाहिजेत, असे पदाधिकारी सांगत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाोबत युती केल्यास येवढ्या जागा वाट्याला येतील की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

मनसेचे नेत्यांकडून अजून कोणासोबत युती झाली नाही मात्र चर्चा सुरू आहेत, असे सांगितले जात आहे. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर बैठका घेऊन पक्ष कोणत्या प्रभागात मजबूत आहे त्याचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान, युती करून लढायचे की स्वबळावर याचा निर्णय राज ठाकरे घेणार आहेत.

कोणत्या मतदारसंघात ताकद

मुंबईतील तब्बल आठ मतदारसंघात मनसेची ताकद आहे. मराठी भाषा बहुल या मतदारसंघामध्ये भांडूप, घाटकोपर, जोगोश्वरी, विक्रोळी, दादर, परळ, लालबाग या मतदारसंघांचा समावेश होतो.

मनसेकडून 125 जागांवर ताकद असलेल्या प्रभागांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत युतीवर चर्चा होताना या मतदारसंघासाठी त्यांचा आग्रह असणार आहे. तर, मराठी भाषिक मतदारसंघात वर्चस्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील या जागांवर दावा केला जाण्याची शक्यता आहे.

2017 मुंबई महापालिका पक्षीय बलाबल

कुण जागा - 227

शिवसेना - 93 (मनसेतून आलेल्या 6 आणि अपक्ष तीन नगरसेवकांसह)

भाजप - 85

काँग्रेस - 30

राष्ट्रवादी काँग्रेसचे - 9

समाजवादी - 6

एमआयएम - 2

मनसे- 1

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT