Parth Pawar Company Land Scam : पुण्यातील जमीन खरेदी-विक्री गैरव्यवहारात माजी सनदी अधिकाऱ्याचा मोठा दावा

Former IAS officer accuses involvement in Pune land deal scam: महाराष्ट्र कनिष्ठ गाव वतन कायदा 1969नुसार पुण्यातील जमिनीसंदर्भात सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रधान सचिव किशोर गजभिये यांनी मोठा दावा केला आहे.
Pune land scam
Pune land scamSarkarnama
Published on
Updated on

Pune Mahar Watandar Land Issue : पुण्यातील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रधान सचिव किशोर गजभिये यांनी मोठा दावा केला आहे. हा व्यवहार कायद्यानुसार अवैध आहे.

परंतु महाराष्ट्र कनिष्ठ गाव वतन कायदा 1969 नुसार त्या जमिनी मूळ वतनदारांनाच द्याव्या लागतील. या जमिनीचे मालक सरकार नसून, यासाठी तयार केलेले आमुख्त्यारपत्रही बेकादेशीर असल्याचा दावाही किशोर गजभिये यांनी केला.

पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील (Pune) कोरेगाव पार्क परिसरातील चाळीस एकर जागेच्या खरेदी-विक्री व्यवहारप्रकरणी चौकशी सुरू आहे. ही जमीन महार वतनाशी निगडीत असल्याने त्यावर किशोर गजभिये यांनी या जमिनीबाबतच्या कायदेशीर तरतुदींवर भाष्य केले.

या जमीन व्यवहारासंदर्भात अनेक बेकायदेशीर बाबी पुढे आल्या आहेत. या जमिनीचे मूळ मालक 272 महार वतनदार असून, मुंबई सरकार किंवा महाराष्ट्र सरकार मालक नाही. ही जमीन महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) मालकीची आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. या जमिनीच्या 7/12 वर मुंबई सरकार ही घेतलेली नोंद चुकीची आहे, असा दावा किशोर गजभिये यांनी केला.

Pune land scam
BJP voter list issue : खबरदार! चुकीची माहिती पसरवल्यास; आयुक्त डांगे 'अ‍ॅक्शन मोड'वर, भुतारेंच्या अडचणी वाढल्या...

व्यवहार प्रारंभापासून बेकायदेशीर

तसेच अशी जमीन महार वतनदारांच्या जमिनी आमुख्यत्यारपत्र घेऊन ताब्यात घेता येत नाहीत, वा विकता येत नाही. त्यामुळे शीतल तेजवानी यांचे आमुख्त्यारपत्र प्रारंभापासूनच रद्दबातल, बेकायदेशीर व शून्य ठरते. तसेच, या जमिनीचा अमेडिया एंटरप्राईजेसने केलेला खरेदीचा व्यवहार देखील प्रारंभापासूनच रद्दबातल, बेकायदेशीर व शून्य ठरतो, असेही किशोर गजभिये यांनी सांगितले.

Pune land scam
Top 10 News : पडळकरांच्या अडचणीत भर, मंत्री विखेंवर बच्चू कडूंचा 'प्रहार' अन् मोहन भागवत यांच्या विधानापासून ते माजी नगराध्यक्षाने पत्नीसाठी थोपाटले दंड यासह वाचा Top Ten राजकीय घडामोडी...

मूळ वतनदारांना न्याय द्या

सरकारसमोर या जमिनीचे सर्व व्यवहार व सर्व हस्तांतरण 'महाराष्ट्र कनिष्ठ गाव वतन कायदा 1969'नुसार रद्द करून आजही जीवंत असलेल्या 272मूळ वतनदारांच्या ताब्यात या जमिनी देण्यात याव्या, जेणेकरून महार वतनदार कायद्याचे उल्लंघन सरकारकडून होणार नाही आणि मूळ वतनदारांना न्याय मिळेल, असेही किशोर गजभिये यांनी म्हटले.

जमिनी सरकारी नाहीत

राज्य सरकारला महार वतनदाराची जमीन ताब्यात घेऊन नुकसानभरपाई न देता महार वतनाच्या जमिनी लीजवर देता येत नाही. या जमिनी सरकारी नाहीत, तर महार वतनदाराच्या ताब्यातील खासगी जमिनी आहेत, असेही किशोर गजभिये यांचे म्हणणे आहे.

काय आहे महारवतनदारी?

इंग्रज राजवटीपूर्वीपासून गावकामगार महार यांना तत्कालीन राजे, सरदार, जहागिरदार यांनी परंपरेनुसार दान केलेल्या या जमिनी आहेत. महार वतनदारांना सरकारमधील अधिकारी, रसूखदार व सरकार दरबारातील कारकून, हिशेबनीस, चिटणीस, पोतनीस अशा सर्व अधिकाऱ्यांची सेवा करावी लागत होती.

त्यामध्ये पत्रे, आदेश आदींचे लखोटे दुसऱ्या गावात पोहोचविणे, पोलिस पाटलांच्या हाताखाली कामे करणे, अशी कामे करावी लागत असत. या कामाचा मोबदला म्हणून त्यांना पगार मदत नव्हती. तर, उदरनिर्वाहासाठी जमिनी कायमच्या प्रदान करण्यात आल्या होत्या. याला महार वतन जमिनी म्हणतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com