Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama
मुंबई

राणे शिवसेनेवर तुटून पडले अन् दूसऱ्या दिवशीच हातावर नोटीस; वाद चिघळणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना काल (गुरुवारी) नोटीस बजावली आहे. राणे यांच्या जुहू येथील 'अधिश' या बंगल्याची अंतर्गत तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. 'के' वेस्ट वॉर्डकडून ही नोटीस देण्यात आली आहे. बंगल्याच्या आतील काही बांधकाम विनापरवाना करण्यात आले आहे का? याची महापालिका पहाणी करणार आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या अधिश बंगल्याबाबत बांधणीसाठी सादर केलेल्या प्लॅनमध्ये बदल करत बंगल्याचे बांधकाम करण्यात आल्याची तक्रार महापालिकेला २०१७ मध्ये मिळाली होती. या बंगल्याचे बांधकाम हे 'सीआरझेड'चे उल्लंघन असल्याबाबतची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

बुधवारी केली होती शिवसेनेवर टीका

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना (shivsena) भवनात पत्रकार परिषद घेत, भाजप नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी नारायण राणे यांनी शिवसेनेला आणि राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत हा पूर्णपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माणूस आहे. त्यामुळे शरद पवारांच्या सहकार्याने ते मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असल्याची टीका राणे यांनी केली.

राणे पुढे म्हणाले, संजय राऊतांना मी आज ओळखत नाही. माझ्याकडे त्यांची कुंडली आहे. सगळे व्यवहार माझ्याकडे आहेत. उद्धव ठाकरेंच्या डोस्पिज केलेल्या गुन्ह्याबद्दल, झालेल्या व्यवहारांबद्दल तुझ्यापेक्षा मला माहित आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांना फटकारले. ईडीच्या अधिकाऱ्यांवर ३०० कोटी घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी शांत बसू नये. घेवून जावं त्याला आणि जरा चांगली पुजा करावी आणि विचारावं ३०० कोटी कोणाकडून घेतले ते दाखवा. त्याशिवाय त्यांच तोंड बंद होणार नाही, असेही राणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT