Mumbai University and Bombay High Court Sarkarnama
मुंबई

Mumbai Senate Elections: सिनेट निवडणूक स्थगिती विरोधातील याचिकेवर सोमवारी फैसला ? हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Mumbai University Senate Election : सोमवारी होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकार प्रतिज्ञापत्र सादर करण्याची शक्यता आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेली सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्यात आल्याने चांगलेच राजकारण तापले होते. या स्थगिती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

मागील सुनावणीत मुंबई विद्यापीठाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते, तर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर सरकारची विनंती मान्य करत न्यायालयाने 9 ऑक्टोबरला अंतिम सुनावणी निश्चित केली होती. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकार प्रतिज्ञापत्र सादर करण्याची शक्यता आहे.

सिनेट निवडणूक स्थगिती विरोधातील याचिकेवर सोमवारी होणाऱ्या सुनावणीत उच्च न्यायालय महत्त्वाचे निर्देश देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ही सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्याची ही कृती बेकायदेशीर असल्याचे या याचिकेत म्हटलेले आहे. त्यामुळे आता यावर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देतं, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही राजकीय दबावापोटी स्थगित करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. तसेच ही सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलनदेखील केले होते.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT