Vikhe-Patil Chandrapur Daura: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा महसूलमंत्र्यांनी घेतला आढावा; शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

RadhaKrishna Vikhe Patil News: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रपूरच्या चिमुर तालुक्यातील शेताच्या बांधावर जात नुकसानीचा आढावा घेतला.
RadhaKrishna Vikhe Patil
RadhaKrishna Vikhe PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. एकीकडे अतिवृष्टीने पीक वाया गेले असता, दुसरीकडे पिकांवर आलेल्या रोगांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हाती येणारे सोयाबीनचे पीक अगदी डोळ्यांसमोर सुकून गेले. यामुळे बळीराजा हतबल झाला असून, आर्थिक अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा काढला, पण त्याचा फायदा होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

या अनुषंगाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रपूरच्या चिमुर तालुक्यातील शेताच्या बांधावर जात नुकसानीचा आढावा घेतला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा तर मिळणारच, पण शासनाकडून त्यांना मदत करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RadhaKrishna Vikhe Patil
Madhya Pradesh Election : निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का; मोठा नेता भाजपच्या गळाला

यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या अतिवृष्टीने पन्नास टक्के पिकाचे पूर्ण नुकसान झाले. अर्धे पीक तरी हाती येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण पिकांवर पडलेल्या रोगाने संपूर्ण पीक हातातून गेले.

काही दिवसांपूर्वी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यात पिकांची पाहणी केली होती. त्यानंतर पिकावर कोणता रोग आला, याचे निरीक्षण करण्याकरता शास्त्रज्ञ आले. त्यांनी हा मोझक रोग नसल्याचा निर्वाळा दिला, पण पिकांवर उपाययोजना करण्यासंदर्भात यातून तोडगा निघू शकला नाही.

आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विदर्भ दौऱ्यावर होते. या वेळी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील चार गावांतील काही शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्षपणे जाऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. पिकांची झालेली नासाडी पाहून आपल्याला प्रचंड वेदना झाल्या. ज्यांनी स्वत: कष्ट घेत मेहनतीने पिकाची लागवड केली. त्यांच्या वेदना किती भयानक असतील, हे आपण समजू शकतो, असे विखे म्हणाले.

दरम्यान, रोगामुळे नव्वद टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याचे ते म्हणाले. पीकविमा कंपनीला कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पाडू, तसेच राज्य सरकारच्या वतीने प्रत्यक्ष कशी मदत करता येईल, यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पीकविमा कंपनी 25 टक्के अग्रिम नुकसानभरपाई देणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

Edited by Ganesh Thombare

RadhaKrishna Vikhe Patil
MLA Mangesh Chavan: आमदार चव्हाणांनी घेतली शिक्षकांची 'शाळा'; विद्यार्थ्यांना शिकवण्यावरून केली कानउघाडणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.