Nitesh Rane, Geeta Jain Sarkarnama
मुंबई

Mumbai High court: धमकावण्याची 'PHD' अंगलट येणार, भडकावू भाषणप्रकरणी राणे आणि जैन यांच्यावर कारवाईचे आदेश

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024 : आम्हाला धमकाविण्याची पीएच.डी. प्राप्त आहे, असे म्हणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह गीता जैन (Geeta Jain) यांच्यावर भडकावू भाषण प्रकरणात कारवाई करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. "मुश्ताक नावाचा कोणी जनरेटर लावतो आणि त्याने पुन्हा जनरेटर लावले तर त्या जनरेटरमध्ये जाळून टाकू. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी. हिंदूसाठी बिल्डिंगमध्ये घुसत बांगलादेशी बाहेर काढू.

पंधरा दिवसांचा अवधी म्हाडा, बीएमसी यांना देतो, त्यांनी कारवाई करावी. हिंदू समाजाला धमकाविण्यात आले तर आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला दादागिरी करता येती, तर आम्हाला पण धमकाविता येते. त्यात आमची पीएच.डी. आहे. बांगलादेशी, रोहिंग्यांना कोण पोसत आहे" असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला होता. लँड जिहाद विरोधात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काही वादग्रस्त विधाने केली होती. तशाच प्रकारचे वादग्रस्त विधान गीता जैन (Geeta Jain) यांनीदेखील केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वादग्रस्त विधान आणि भडकावू भाषण देणाऱ्या भाजपच्या (BJP) दोन नेत्यांवर कारवाई करणार का? अशी विचारणा आज मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई व ठाणे (Mumbai-Thane) पोलिस आयुक्तांना आठवडाभरात याविषयी त्यांची बाजू मांडावी लागणार आहे. भाजपच्या दोन नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार असून, पुढील सोमवारी या विषयीची सुनावणी होणार आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर केलेल्या वादग्रस्त विधान आणि कृतीमुळे हे दोन्ही भाजप नेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. ठाणे व मुंबई पोलिस आयुक्त या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भडकावू भाषण दिल्याप्रकरणी दाखल याचिकेची मुंबई हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली. भाजप आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांच्यावर कारवाई करणार का? अशी विचारणाच थेट मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. या संदर्भात मुंबई आणि ठाणे पोलिस आयुक्तांना आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अयोध्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्याच्या एक दिवस आधी मीरा रोड (Meera Road) मात्र जातीय तणावामुळे चर्चेत आला. मीरा रोडच्या नया नगर भागात राम मंदिर शोभायात्रा काढणाऱ्या लोकांवर हल्ला करण्यात आला. यानंतर परिसरात तणाव पसरला. पोलिसांनी 19 जणांना अटक केली होती. 23 जानेवारी रोजी बेकायदा बांधकामांवर स्थानिक पालिकेकडून बुलडोझरची कारवाई करत रस्त्या लगतचे दुकाने पाडण्यात आली. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा एआयएमआयएमसह इतर संघटनांनी एकतर्फी कारवाईचा आरोप केला होता. आज उच्च न्यायालयाने या प्रकरणात भडकावू भाषण देणाऱ्या आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

मीरा रोड आणि मुंबईतील काही नागरिकांनी भाजप आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांच्या भडकावू भाषणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. भाजप नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या हिंसाचारातील 2 पीडितांसह 5 याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही पोलिस स्वत:हून गुन्हे नोंदविण्यात अयशस्वी ठरल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली.

याचिकाकर्त्यांचा दावा आहे की संघर्ष सुरू असताना राणे यांनी स्थानिक आमदार जैन यांच्यासह मीरा रोडच्या काही भागांना भेट दिली आणि त्यांच्या भाषणातून अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना धमकावले गेले. राणे यांनी गोवंडी आणि मालवणीसह इतर उपनगरांनाही भेट दिली आणि अधिक द्वेषपूर्ण भाषणे दिली, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT