Sanjay Nirupam News : 'खिचडी'ला निरुपमांनी दिला 'तडका', राऊतच मुख्य आरोपी; मुलगी अन् भावाच्या बँक खात्यावर...

khichdi scam : खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकरांची ईडीकडे आज चौकशी सुरू असताना निरुपमांनी राऊतांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
Sanjay Nirupam | Sanjay Raut
Sanjay Nirupam | Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसनं हकालपट्टी केलेल्या संजय निरुपम ( Sanjay Nirupam ) यांनी थेट सोमवारी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. राऊत कुटुंबानं एक कोटी रुपयांची खंडणी घेतली आहे, असा हल्लाबोल निरुपम यांनी केला आहे.

उत्तर पश्चिममधून ठाकरे गटानं अमोल कीर्तिकर ( Amol Kirtikar ) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय निरुपम ( Sanjay Nirupam ) नाराज होते. या जागेबाबत काँग्रेसनं नेतृत्वानं विचार करावा म्हणत पक्षाला मुदत दिली होती. पण, पक्षविरोधी कारवाई केल्यानं निरुपमांविरोधात काँग्रेसनं हकालपट्टीची कारवाई केली. त्यानंतर निरुपम शिंदे गटात जाणार असल्याचं सांगण्यात येत होते. अशातच आता निरुपम यांनी ठाकरे गटाविरोधात आपला मोर्चा उघडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निरुपम म्हणाले, "संजय राऊत ( Sanjay Raut ) खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पत्राचाळ घोटाळ्यात राऊतांनी बिल्डरकडून पत्नीच्या नावावर खंडणी घेतली होती. पण, खिचडी घोटाळ्यात राऊतांनी मुलगी, भाऊ आणि सहकाऱ्याच्या नावावर पैसे घेतले."

"सह्याद्री रिफ्रेशमेन्ट नावाच्या कंपनीत राहुल साळुंखे आणि सुजित पाटकर हे संजय राऊतांचे सहकारी आहेत. या कंपनीला कोरोना काळात सहा कोटी 36 लाख रुपयांचं खिचडीचं कंत्राट मिळालं होतं. कंपनीकडून राऊतांच्या कुटुंबानं एक कोटी रुपये खंडणीच्या स्वरूपात घेतले. सह्याद्री रिफ्रेशमेन्ट काय आहे हे, राऊतांच्या मुलीला माहितीही नसेल. राऊतांनी चेकद्वारे मुलीच्या नावार खंडणी घेतली आहे. त्यात 29 मे 2020 मध्ये 3 लाख, 26 जून 2020 मध्ये 5 लाख, 7 ऑगस्ट 2020 मध्ये 1 लाख 25 हजार, 20 ऑगस्ट 2023 ला 3 लाख रुपये चेकद्वारे राऊतांच्या मुलीच्या नावावर बँकेत जमा झाले," असा दावा निरूपमांनी केला.

Sanjay Nirupam | Sanjay Raut
Sanjay Raut News : महाजनांना जळगावमध्ये जागा दाखवणारच; भाजपच्या 'संकटमोचकां'ना राऊतांचं आव्हान

"त्यासह संदीप राजाराम राऊत यांच्या अकाउंटमध्ये 6 ऑगस्ट 2020 मध्ये 5 लाख, 20 ऑगस्ट 1 लाख 25 हजारांचा, तर सुजित पाटकरांच्या अकाउंटमध्ये 15 जुलै 2020 मध्ये 14 लाख, 5 ऑगस्ट 2020 मध्ये परत 14 लाख, 29 ऑक्टोबर 2020 मध्ये 10 लाख, 17 डिसेंबर 2020 मध्ये 1 लाख 90 हजार आणि 12 जानेवारीला 1 लाख 90 हजार रूपये चेकद्वारे जमा झाले," असंही निरुपमांनी सांगितलं.

दरम्यान, खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवार अमोल कीर्तिकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्याच निरुपमांनी ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

R

Sanjay Nirupam | Sanjay Raut
Sanjay Raut News : 'त्यांचे विमान फक्त गुजरातला जाऊ नये'; खासदार राऊतांनी कोणाला हाणला टोला !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com