Sindhudurga News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळेच नेते प्रचाराला लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Avhad यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. देश वाचवायचा असेल तर सत्ता बदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने BJP भ्रष्टाचार केला आहे असा आरोप तसेच भारताच्या इतिहासात एवढा मोठा भ्रष्टाचार कधी झाला नव्हता. विधानसभेला ही अद्भुत पूर्व मतदान करायचे आहे. तसेच रत्नागिरीतून उदय सामंत आणि सिंधुदुर्गतून दीपक केसरकर Deepak Kesarkar ही पिल्लावळ कायमची ठेचा, असे आव्हान ही या वेळी आव्हाडांनी ठाण्यात आयोजित केलेल्या शिमगोत्सवात कोकणवासीयांना केले.
आव्हाडांनी लोकांना धर्माच्या नावाने वेडे बनवण्याचे आणि पैसे कमवायचे हेच भाजपचे BJP धोरण आहे. मार्क्सने 1853 मध्ये सांगितले होते, धर्म ही एक अफूची गोळी आहे. एकदा खाल्ली तर झोपला की संपलात. त्यामुळे उठा जागे व्हा या महाराष्ट्राला देशाला वाचवा तसेच संविधानही वाचा असे ही त्यांनी या वेळी म्हटले. latest News on loksabha Election 2024
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी इंग्लंडमध्ये अडीचशे वर्षे लागली. अमेरिकेत साडेतीनशे वर्षे लागली, मात्र भारतात 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान स्वीकारल्यावर पुरुषांबरोबर महिलांनाही मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. जेवढे पुरुषांना अधिकार आहेत.
तेवढेच अधिकार महिलांना आहेत. संविधानामुळेच समता आणि समानता आपल्याला मिळाली आहे. संविधान बदलणार असेल तर त्याचा पहिला धोका हा महिलांना असल्याचेही आव्हाडांनी उपस्थित महिलांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मनुस्मृती ही महिलांच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय देश बदलला तर वासे फिरतील. मोठ्या मोठ्या मुश्किलीने स्वातंत्र्यवीरांनी आपल्या हाती स्वातंत्र्य मिळवून हा देश आपल्या स्वाधीन केला आहे, याचीही आठवण त्यांनी या वेळी करून दिली.
बारसू रिफायनीने Barsu Refinery चाळीस हजार जणांचे काम जाऊन चार हजार नोकऱ्या मिळणार आहेत. तसेच कोकणाचे सौंदर्य नष्ट होईल. तसेच समुद्रकिनारी मिळणारे मासे 10 किलोमीटर आत जातील आणि त्यामुळे छोटे मासेमारी करणारे कोळी बांधव मारले जातील. म्हणजेच तुम्हालाही मारण्याचा विचार केला गेला आहे, असा आरोपही या वेळी आव्हाडांनी केला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करूनच मतदान करा, हे सरकार बदलायचं आहेच, याशिवाय विधानसभेला अद्भुत पूर्व मतदान करायचे आहे असे म्हणताना, त्यांनी रत्नागिरीतून उदय सामंत Uday Samant आणि सिंधुदुर्गमधून दीपक केसरकर ही पिल्लावळ कायमची ठेचा असे आवाहनही कोकणवासींना केले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.